पंतप्रधान नरेंद्र मोदी G 7 परिषदेला लावणार हजेरी

28 जून रोजी संयुक्त अरब अमिरातीला ही देणार भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी G 7 परिषदेला लावणार हजेरी
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ते 27 जून रोजी होत असलेल्या G7 च्या बैठकीत सहभाग नोंदवणार असल्याची माहिती नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या विदेश दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 जून रोजी संयुक्त अरब अमिराती (UAE) ला ही भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीतील G7 शिखर परिषद झाल्यानंतर संयुक्त अरब अमिराती (UAE) आणि UAE चे माजी अध्यक्ष आणि अबू धाबीचे शासक शेख खलिफा बिन झायेद अल यांना ही भेट देतील. अशी ही माहिती समोर आली आहे. (pm Narendra Modi to visit Germany UAE from June 28 to attend g7 summit )

Prime Minister Narendra Modi
वाढत्या बलात्कार आणि बाल शोषण घटनांनी पाकिस्तान सरकार धास्तावले

पंतप्रधान मोदी जर्मनीत शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत

यावेळी जर्मनीच्या अध्यक्षतेखाली G7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे, ज्यामध्ये अर्जेंटिना, इंडोनेशिया, सेनेगल, दक्षिण आफ्रिका या देशांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, जर्मनी दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी दोन सत्रांना संबोधित करण्याची शक्यता आहे. पर्यावरण, ऊर्जा, हवामान, अन्न सुरक्षा, आरोग्य, लैंगिक समानता आणि लोकशाही या विषयांचा समावेश आहे. या शिखर परिषदेच्या बाजूला पंतप्रधान शिखर परिषदेत सहभागी असलेल्या काही देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठकाही घेणार असल्याचे सांगण्यात आले.

G-7 म्हणजे नेमकं काय ?

G-7 हा जगातील सात सर्वात मोठ्या विकसित आणि प्रगत अर्थव्यवस्था असलेल्या देशांचा समूह आहे, ज्यामध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स यांचा समावेश आहे. त्याला ग्रुप ऑफ सेव्हन असेही म्हणतात. समूह स्वतःला "मूल्यांचा समुदाय" मानतो, म्हणजे मूल्यांचा आदर करणारा समुदाय. स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांचे संरक्षण, लोकशाही आणि कायद्याचे राज्य आणि समृद्धी आणि शाश्वत विकास ही त्याची मुख्य तत्त्वे आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com