पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेमध्ये वाढ

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ‘किल नरेंद्र मोदी’ एवढेच शब्द लिहिलेला ईमेलचा माग ‘एनआयए’ला लागल्यानंतर त्यांनी गृह खात्याला याबाबत तातडीने सावध केले आहे. हा ईमेल आठ ऑगस्टला लिहिला होता. 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची सूचना देणारा एक ईमेल राष्ट्रीय तपास संस्थेला हाती लागला असून यानंतर मोदींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. 

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, केवळ ‘किल नरेंद्र मोदी’ एवढेच शब्द लिहिलेला ईमेलचा माग ‘एनआयए’ला लागल्यानंतर त्यांनी गृह खात्याला याबाबत तातडीने सावध केले आहे. हा ईमेल आठ ऑगस्टला लिहिला होता. 

गृह मंत्रालयाने पंतप्रधानांची सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला याबाबत माहिती दिल्यावर मोदींची सुरक्षा वाढवली आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या