पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं कोण लिहितं? PMO ने दिली माहिती

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 3 मार्च 2021

आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी ठराविक प्रकारचे शब्द वापरतात आणि विरोधकांना टोमणे मारून अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्व पडत असेल, कि पंतप्रधानांची ही भाषणं नेमकं लिहितं तरी कोण?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या प्रभावी आणि रोचक भाषणांसाठी ओळखले जातात. 'मन की बात' असो वा अन्य कोणताही कार्यक्रम, पंतप्रधान मोदी कायम उत्साहाने संवाद साधतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी कायमच गर्दी होते. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी ठराविक प्रकारचे शब्द वापरतात आणि विरोधकांना टोमणे मारून अनोख्या पद्धतीने प्रतिक्रिया देतात. बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्व पडत असेल, कि पंतप्रधानांची ही भाषणं नेमकं लिहितं तरी कोण? पंतप्रधान मोदी हे स्वतः लिहित आहेत की कोणीतरी त्यांना हे लिहून देत आहे? 

बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळींनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल

माहिती अधिकार कायद्याअंतर्गत (आरटीआय) पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) याबाबत माहिती मागविण्यात आली होती. पंतप्रधान कार्यालयाने 
स्वत: पंतप्रधान मोदी भाषणाचे अंतिम संपादन करत असल्याची माहिती दिली आहे.  ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वेबसाइटनुसार पंतप्रधानांच्या भाषणांविषयीच्या माहितीसाठी आरटीआय अंतर्गत पीएमओमध्ये अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना पीएमओ म्हणाले की पंतप्रधान स्वत:च अंतिम भाषण तयार  करतात. कार्यक्रमाच्या प्रकारानुसार पंतप्रधानांना वेगवेगळ्या व्यक्ती, अधिकारी, विभाग, युनिट, संस्था इत्यादींकडून माहिती दिली जाते. या माहितीच्या आधारे पंतप्रधान स्वत: अंतिम भाषण तयार करतात.

पीएमओने या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत

पंतप्रधानांचे भाषण लिहिण्यासाठी एक टीम आहे का असेही विचारले गेले होते. जर होय, तर त्याचे किती सदस्य आहेत? त्यांना किती पैसे दिले जातात? या प्रश्नांचादेखील समावेश होता. परंतु, पीएमओने या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.

2014 च्या निवडणुकीत मोदींनी भाजपाला मोठा विजय मिळवून दिला

2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी भाजपाला मोठ्या प्रमाणात विजय मिळवून दिला. मोदींना चेहरा करून भाजपाने लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यांच्या प्रचाराच्या आक्रमक शैलीने कॉंग्रेसला बॅकफूटवर नेलं. मुलांपासून वृद्धापर्यंत, जिभेवर एकच नाव होतं ते म्हणजे..'मोदी'.

बंगाल निवडणुकीपूर्वीच काँग्रेसला लागलं ग्रहण; पक्षांतर्गत खडाजंगी बाहेर

प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हातखंडा

मोदींची सर्वात मोठी आणि विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांची भाषण कला आणि त्यांनी आपल्या कलेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणे. विकास आणि इतर विषयांवर ते स्पष्टपणे आणि प्रभावी पद्धतीने व्यक्त करतात. कोणत्याही तयारीशिवाय त्यांचे भाषण लोकांवर प्रभाव पाडते. देशातील इतर काही नेत्यांप्रमाणे ते लेखी भाषण वाचून दाखवत नाहीत. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बोलण्याच्या शैलीने कोणत्याही प्रकारच्या प्रेक्षकांशी त्यांचे कनेक्शन तयार होतं. 

या माजी पंतप्रधानांनीदेखील स्वत: ची भाषणे स्वत:च तयार केली होती

कोणत्याही मोठ्या नेत्याला भाषण तयार करायचे असल्यास त्याच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. पंतप्रधानांच्या भाषणासाठी, पक्ष, मंत्री, विषय तज्ज्ञ, पंतप्रधानांची स्वत: ची टीम माहिती गोळा करते आणि मग ती निश्चित केली जाते. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी या कुशल प्रवक्त्यांनी स्वत: ची भाषणे स्वत:च तयार केली होती. 

संबंधित बातम्या