पीएम केअर फंडाची माहिती  देण्यास पीएमओचा नकार 

Dainik Gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

आरटीआय अधिनियम 2015 च्या कलम 2 (एच) अंतर्गत पीएम केअर फंड हा सार्वजनिक प्राधिकरण नसल्याचे सांगत गलगली यांच्या सर्व आरटीआय अर्ज फेटाळण्यात आले.

मुंबई

कोविड 19 च्या साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी देशभरातील नागरिक पंतप्रधान केअर फंडामध्ये हातभार लावत आहेत. अशा परिस्थितीत राजकीय पक्षांनी दिलेल्या निधीची माहिती देण्यास पंतप्रधान कार्यालयाने नकार दिला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती मागितली असता ही बाब समोर आली आहे.
मुंबईतील आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडून चार वेगवेगळ्या प्रकारचे आरटीआय अर्ज करत माहिती मागितली होती. आरटीआय अधिनियम 2015 च्या कलम 2 (एच) अंतर्गत पीएम केअर फंड हा सार्वजनिक प्राधिकरण नसल्याचे सांगत गलगली यांच्या सर्व आरटीआय अर्ज फेटाळण्यात आले. अनिल गलगली यांनी राजकीय पक्षांच्या योगदानाबद्दल माहिती मागितली होती, मात्र त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

संबंधित बातम्या