गोंधळाने केली पंचाईत, पोलिसांच्या हाती लागली शस्त्रांची फॅक्टरी!

दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या गाझियाबादमध्ये (Ghaziabad) पोलिसांनी अवैध शस्त्र कारखाना पकडला आहे.
गोंधळाने केली पंचाईत, पोलिसांच्या हाती लागली शस्त्रांची फॅक्टरी!
Illegal weaponsDainik Gomantak

दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या गाझियाबादमध्ये (Ghaziabad) पोलिसांनी अवैध शस्त्र कारखाना पकडला आहे. एका घरात तळघर बनवून हा कारखाना चालवला जात होता. कारखाना अशा प्रकारे बांधण्यात आला होता की, खोलीच्या आत बेकायदेशीर शस्त्रे (Illegal weapons) बनवली जात आहेत याची कोणी कल्पनाही करु शकत नाही. घटनास्थळावरुन 25 पिस्तूल जप्त केल्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. गाझियाबादच्या मुरादनगरमध्ये हा अवैध शस्त्रांचा कारखाना सुरु होता. पिस्तूल व्यतिरिक्त पोलिसांनी येथे छापा टाकून बॅरल, दीड लाख रुपये, काडतुसे, पिस्तूल बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. या टोळीचा सूत्रधार मेरठचा (Meerut) रहिवासी असून तो फरार झाला आहे. पोलिसांनी त्याच्या पत्नीलाही अटक केली आहे.

Illegal weapons
दिल्ली सरकारचा 'देश के मेंटर' कार्यक्रम, सोनू सूद ब्रँड ॲम्बेसेडर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी येथे बेकायदेशीर पिस्तूल बनवण्याचा कारखाना चालवला जात होता. आतापर्यंत किती लोकांना शस्त्रांचा पुरवठा करण्यात आला आहे, याचा तपास केला जात आहे. तळघर पाहून पोलिसांना सर्वात जास्त आश्चर्य वाटले. खरं तर, एका अज्ञाताने पोलिसांना फोन करून रद्दीच्या गोदामासह बांधलेल्या घरातून रात्री आवाज येत असल्याची तक्रार केली नसती तर पोलिसही इथे पोहोचले नसते. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी पोलीस घराच्या आत पोहोचले, तेव्हाच पोलिसांना दरवाजाच्या मागे दुसरा दरवाजा सापडला. पोलिसांना हे थोडे आश्चर्यकारक वाटले. कारण खोलीच्या एका बाजूला स्वतंत्र स्नानगृह बनवले होते. बाथरुम देखील बाहेर बांधण्यात आले होते. बाकीच्या खोल्या, स्वयंपाकघर सुद्धा बाहेर होते. मग खोलीच्या आत दुसरी खोली बनवण्यात काय अर्थ आहे?

Illegal weapons
IRCTC द्वारे घेता येणार समुद्रपर्यटनाचा आनंद, ऑनलाईन होणार बुकिंग

जेव्हा पोलिसांनी तो दरवाजा उघडला तेव्हा 6 फुटांची एक छोटीशी जागा तयार करण्यात आली होती. ज्यामध्ये एका कोपऱ्यात सीवर कव्हरसारखा स्लॅब ठेवण्यात आला होता. जेव्हा पोलिसांनी तो स्लॅब काढला तेव्हा त्यांना तळाशी एक लोखंडी शिडी सापडली. जेव्हा पोलिसांनी त्याच्याकडून खाली पाहिले तेव्हा पुढे एक छोटा बोगदा सापडला, त्यानंतर पुन्हा एकदा तीच लोखंडी शिडी खाली जाताना आढळली. त्यापेक्षा खाली पाहिले असता संपूर्ण शस्त्र कारखाना दिसला. यानंतर पोलिसांनी कारखाना सील केला आणि आरोपींना अटक केली. हे लोक बिहारमधील मुंगेरमध्ये ठेके घेत असत आणि नंतर इथे देशी कट्टा बनवायचे.

Illegal weapons
IRCTC Onam Special Train: बघता येणार केरळ गोवा, दिल्ली, स्टॅच्यू ऑफ युनिटी...

दरम्यान, या टोळीचा म्होरक्या त्याच्या नातेवाईकासह फरार झाला आहे, तरी एका गुंडाच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. आरोपी मुस्तफा, सलाम, कैफी आलम, सलमान आणि असघारी हे सर्व गाझियाबादच्या मुरादनगर पोलीस स्टेशन परिसरात बेकायदेशीर शस्त्रे बनवायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीचा म्होरक्या झहीरुद्दीन (Zahiruddin) असून तो त्याच्या नातेवाईक फयाजसोबत फरार आहे. जहीरुद्दीन हा मेरठचा रहिवासी आहे आणि तो आधी मेरठमध्ये बेकायदेशीर शस्त्रे बनवत असे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. तिथे पकडल्यानंतर त्याने गाझियाबादमध्ये त्याची सुरुवात केली. पोलीस त्या सर्वांचा शोध घेत आहेत. या बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा दिल्ली-एनसीआरमध्ये करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com