पोलिसांनी लग्नाची वरात अडवून केली कोरोना टेस्ट; नवरदेवच आढळला पॉझिटिव्ह

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली.

कोरोना (Corona) महामारीने रौद्र रूप धारण केले असताना देखील लग्न (Marriage) सोहळे काही थांबताना दिसेनात. शेकडो लोक एकत्र आल्याने कोरोना संसर्गाचा (Infection) मोठा धोका असताना देखील लग्न सोहळे मोठ्या जल्लोषात सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. मध्यप्रदेशच्या धारमध्ये एक घटना घडली आणि खळबळ उडाली. लग्न सोहळ्यावर बंदी असताना देखील लोक लग्नसोहळे आयोजित करत असल्याने पोलिसांनी एक वरात अडवून सर्वांची कोरोना चाचणी केली. यावेळी नवरदेवच कोरोनाबाधित आढळल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. ( Police intercept the wedding and test the corona in MP)

यमुना नदीत आढळता आहेत मृतदेह; कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचे असल्याचा संशय
लग्न सोहळ्यांना बंदी असताना धार येथे लग्नाची वरात घेऊन जाणाऱ्या दोन वाहनांना पोलिसांकडून रस्त्यातच थांबविण्यात आले. यानंतर, जेव्हा नवरेवाची अँटिजन टेस्ट केली तेव्हा नवरेवालाच कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. यानंतर, ड्रायव्हरची चाचणी देखील सकारात्मक अली. या घटनेनंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, देशात सध्या कोरोनाविषाणूच्या संक्रमणाची दुसरी लाट जोर धरत असून या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचे पहायला मिळाले आहे. याच अनुशंघाने देशातील अनेक राज्यांत लॉकडाऊन, अंशतः लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू सारखे निर्णय घेण्यात आले आहेत. 

संबंधित बातम्या