"स्पायडरमॅन" प्रमाणे तिसऱ्या मजल्यावर चढून पोलीसांनी वाचवले कुटुंबाला

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 26 मार्च 2021

दिल्लीमध्ये मध्ये झालेल्या या घटनेत पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पोलीस खात्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे.

दिल्ली: सामान्य माणसाच्या मनात पोलिसांची (Police) प्रतिमा ही बहुतांशवेळी नकारात्म असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. भ्रष्टाचार आणि कामातील दिरंगाईमुळे सर्वसामान्य लोक पोलिसांवर नाराज असल्याचे पाहायला मिळते. मात्र दिल्लीमध्ये झालेल्या या घटनेत पोलिसांनी दिलेल्या प्रतिसादामुळे पोलीस खात्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. (Police rescued the family by climbing to the third floor like Spiderman)

दिल्ली पोलिसांच्या एका जवानाने जाणीवपूर्वक व तातडीने कारवाई केल्यामुळे आग लागल्यामुळे एका 87 वर्षीय वृद्ध महिलेसह कुटुंबातील तीन जणांना घराच्या तिसर्‍या मजल्यावरून वाचविण्यात पोलिसांना यश आले. दिल्लीच्या ग्रेटर कैलाश -1 मधून आज सकाळी 6::55 वाजता दिल्ली पोलिसांना फोनद्वारे माहिती मिळाली, त्यानंतर तातडीने पोलिसांनी कुटुंबाला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागलेली होती, तर तिसऱ्या मजल्यावर एक कुटुंब अडकून पडलेला होते.  यावेळी हेडकॉन्स्टेबल मुन्शीलल आणि संदीप यांनी कशाचाही विचार न करता "स्पायडरमॅन"प्रमाणे  इमारतीला असलेल्या लोखंडी जाळीच्या साहाय्याने  तिसऱ्या मजल्यावर जाऊन कुटुंबाची सुखरूप सुटका केली. 

दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या या प्रराक्रमानंतर सर्वच स्तरातून पोलिसांचे कौतुक होताना दिसते आहे. दरम्यान अशा घटनांमधून पोलीस समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची पूर्तता करताना दिसत असतात.  (India)

चीन बॉर्डरवर भारतीय जवानांचा डान्स; लोकं पडले प्रेमात तर केंद्रिय मंत्र्यांनी...
 

संबंधित बातम्या