उत्तराखंडमध्ये बनावट नोटांचा मोठा साठा जप्त

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

भारतीय चलनातील बनावट नोटांचा हा साठा अतिशय मोठा असून याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

गैरसेंण- राज्यातील उधमसिंग नगर जिल्ह्यात बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आला आहे. भारतीय चलनातील बनावट नोटांचा हा साठा अतिशय मोठ्या प्रमाणावर असून याप्रकरणी पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.  

बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नोटा जप्त करण्यात आल्याने हे प्रकरण अधिक गांभीर्याने घेऊन पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. अटकेतील पाचही संशयितांचा याआधीच्या बनावट नोटांच्या प्रकरणांमध्ये संबंध आहे का, याचा तपास पोलिस करत आहेत.   

संबंधित बातम्या