आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंना तिरूपती विमानतळावर पोलिसांनी अडवलं

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या आंध्र प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले एन चंद्रबाबू नायडू यांना सोमवारी तिरुपतीमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याने चंद्राबाबू नायडूंनी तिरूपती विमानतळावर धरणे आंदोलन केलं.

तिरूपती : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्या आंध्र प्रदेश विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले एन चंद्रबाबू नायडू यांना सोमवारी तिरुपतीमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याने चंद्राबाबू नायडूंनी तिरूपती विमानतळावर धरणे आंदोलन केलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा आणि शहरात प्रवेश रोखण्याचा प्रयत्न केला. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले एन चंद्रबाबू नायडू यांनी आपल्याला तिरुपती आणि चित्तूर येथे जाण्यापासून का रोखले जात आहे, हे जाणून घेण्याची मागणी केली असता त्यांचा पोलिस अधिकाऱ्यांशी वादविवाद झाल्याची माहिती मिळाली आहे. "हे काय आहे? कलेक्टरला भेटायचा मला मूलभूत अधिकार नाही का? या देशात काय होत आहे? हा तमाशा काय आहे? तुम्ही मला ताब्यात घेण्याचं कारणच काय ? तुम्ही  मला परवानगी दिली नाही, तर मी इथेच बसून राहिन", असे म्हणत चंद्रबाबू नायडूंनी तिरूपती विमानतळाच्या आगमन टर्मिनलवर धरणे आंदोलन केलं.

पंजाबच्या मुख्यमंत्र्याचे मुख्य सल्लागार प्रशांत किशोर घेणार फक्त 1 रुपये पगार!

हा सगळा प्रसंग खुद्द चंद्राबाबूंनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.  चंद्राबाबू नायडू यांनी पोलिसांबरोबर झालेल्या त्यांच्या संघर्षाची व्हिडिओ क्लिप ट्विट केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांच्यावर निशाणा साधत नायडू म्हणाले की, "तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही, आम्हाला गप्प करू शकणार नाही. आम्ही गप्प बसणार नाही. राज्य पुरस्कृत पूर्वनियोजित कटात सहभागी असलेले तुम्ही मला माझ्या लोकांना भेटण्यापासून थांबवू शकणार नाही," 

पीडितेशी लग्न करणार का? आरोपीला सर्वोच्च न्यायालयाची विचारणा 

माजी मुख्यमंत्री राज्यात सभा का घेऊ शकत नाही, असा जाब त्यांनी सत्ताधारी वायएसआरसीपीला विचारला. वृत्तानुसार तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) नेते एन चंद्रबाबू नायडू तिरुपती येथे राज्य सरकारच्या निषेधार्थ आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तिरूपती विमानतळावर दाखल झाले, परंतु त्यांना पोलिसांनी परवानगी नाकारली. शहरी स्थानिक संस्था निवडणुकीची आचारसंहिता आणि कोरोना परिस्थितीचा हवाला देत पोलिसांनी तिरुपतीमध्ये टीडीपीला निषेध आंदोलन करण्याची परवानगी नाकारली.  

संबंधित बातम्या