बिहारमध्ये दारुबंदीवरून राजकीय विसंवाद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दारुबंदीवरुन राजकीय वाद झडू लागले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम)चे राष्ट्रीय अध्यक्ष जितनराम यांनी ‘दारुबंदी कायद्यावर पुनर्विचार होणे आवश्‍यक आहे. कारण या कायद्यामुळे अनेक निरपराध व्यक्तींना तुरुंगवास घडला आहे, असे वक्तव्य करून राजकीय वाद निर्माण केला आहे. 

पटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दारुबंदीवरुन राजकीय वाद झडू लागले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तानी आवाम मोर्चा (हम)चे राष्ट्रीय अध्यक्ष जितनराम यांनी ‘दारुबंदी कायद्यावर पुनर्विचार होणे आवश्‍यक आहे. कारण या कायद्यामुळे अनेक निरपराध व्यक्तींना तुरुंगवास घडला आहे, असे वक्तव्य करून राजकीय वाद निर्माण केला आहे. 

लोकजनशक्तीचे अध्यक्ष चिराग पासवान बेगूसराय येथील सभेत म्हणाले की, बिहारमध्ये दारुबंदी केली तरी मोठ्या-मोठ्या लोकांकडे घरपोच दारू पोचवली जात आहे आणि ज्याचे कमिशन सर्वांकडे जाते. याआधी काँग्रेसनेही त्यांच्या जाहीरनाम्यात दारूबंदीची समीक्षा करावी, अशी मागणी केली आहे. मांझी म्हणाले की, हा कायदा गरिबांविरोधात आहे. यामुळे अनेक दलित आणि महादलित लोकांना तुरुंगात पाठविले. या कायद्याचे पालन योग्य रीतीने होत नाही. पोलिस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या बड्या माफियांविरोधात कारवाई करण्याऐवजी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांना अटक करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या