उत्तराखंडमध्ये राजकिय़ उलथापालथ; त्रिवेंद्रसिंह रावत यांनी दिला राजीनामा

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना बोलावून घेतले होते.

उत्तराखंड विधानसभा निवडणूकीच्या आगोदर भाजपमध्ये मोठी राजकिय उलथापालथ बघायला मिळत आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर भाजप अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना बोलावून घेतले होते. रावत यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी सोमवारी भेट घेतली.

रावत यांच्या भेटीआगोदर नड्डा यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांच्याशी चर्चा केली होती. त्य़ानंतर नड्डा आणि रावर यांच्यात तब्बल 40 मिनिट चर्चा झाली आहे. रावत यांनी माध्यमांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न देता ते थेट दिल्लीकडे रवाना झाले. 

" संसदेत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळायला हवं"

मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी अखेर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांच्यासोबत उत्तराखंड प्रदेशाध्यक्ष बन्सीधर भगत देखील होते. मुख्यमंत्री रावत आणि भाजप अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यातील बैठक उत्तराखंडमधील राजकिय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर पार पडली. पक्षातील आमदारांचा वाढता असंतोष तसेच मंत्रीमंडळाच्य़ा विस्ताराचा वेळोवेळी निर्माण झालेला प्रश्न यामुळे राज्य़ातील नेतृत्व बदलाची जोरदार चर्चा सुरु झाली होती.

 

संबंधित बातम्या