मोठ्या निर्णयाची शक्यता; पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक बोलवली

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 17 मार्च 2021

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्य़े केंद्रीय पथके पाठवली आहेत.

नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यामध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात कोरोनाची नवी लाट आली असून दिवसेंदिवस रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. इतर राज्यांमधील परिस्थीतीही चिंताजनक आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्य़े केंद्रीय पथके पाठवली असून, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक बोलवली आहे. दुपारी 12.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये कोणते निर्णय घेतले जातील याकडे सगळ्य़ांच लक्ष लागलं आहे.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा पादुर्भाव वाढू लागल्यानंतर पुन्हा राज्यात मंगळवारी 17 हजार रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे कोरोना देशातील कोरोना पिडितांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. इतर राज्यांमध्येही कोरोनाचा आकडा वाढू लागल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही तातडीची बैठक बोलवली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना आणि लसीकऱणाच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच राज्य़ामध्ये कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात पंतप्रधानांकडून सूचना करण्यात येतील असेही सांगण्यात येत आहे.

COVID: लुधियानातील शिक्षक, पत्रकार, बँकर्स ला मिळणार कोविड लस

पंजाब, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्य़ा मोठ्याप्रमाणात वाढू लागली आहे. 24 तासामध्ये 79.73 इतकी सकारात्मता दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी गुजरात सरकारने मंगळवारी चार मोठ्या शहरांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत आणखी दोन तासांची वाढ करण्यात आली आहे. हे निर्बंध 31 मार्चपर्यंत लागू असणार आहेत.

 

संबंधित बातम्या