राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोनामुळे नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

राजधानी दिल्लीत पुन्हा आलेली कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने रात्रीच्या संचारबंदीची तयारी केली आहे. दरम्यान, सरकारने नुकत्याच केलेल्या घरोघर सर्वेक्षणात ५७ लाख ३० हजारांपैकी १३ हजार ५१६ जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली व ११७८ लोक कोरोनाग्रस्त आहेत. 

नवी दिल्ली :  राजधानी दिल्लीत पुन्हा आलेली कोरोनाची लाट थोपविण्यासाठी राज्य सरकारने रात्रीच्या संचारबंदीची तयारी केली आहे. दरम्यान, सरकारने नुकत्याच केलेल्या घरोघर सर्वेक्षणात ५७ लाख ३० हजारांपैकी १३ हजार ५१६ जास्त लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली व ११७८ लोक कोरोनाग्रस्त आहेत. 

संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या ८४१३ लोकांची ओळखही पटविण्यात आली आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने, कॅनॉट प्लेससारख्या बाजारपेठा व सरकारी कचेऱ्यांचा भाग असलेल्या मध्य दिल्लीत सर्वाधिक संक्रमित लोक आढळले आहेत.
दिल्लीत पुन्हा कोरोनाचा कहर सुरू झाला असून, आज सलग दुसऱ्या दिवसी १०० हून जास्त लोकांनी जीव गमावला आहे. मागील २४ तासांत ६६०८ नवे कोरोनाग्रस्त आढळले. देशातील १० वा संक्रमित व पाचवा मृत्यू दिल्लीत होत आहे. दिल्लीतील करोनाचा कहर रोखण्यासाठी कंटेनमेंट व प्रचंड गर्दीच्या भागांत सक्तीच्या टाळेबंदीची म्हणजे मिनी लॉकडाउनची तयारी असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून आहे. मात्र बाजारपेठा व उद्योग पुन्हा पूर्णपणे बंद करण्यास अरविंद केजरीवाल सरकार अनुकूल नाही. 

आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा :

रोशनी कायद्याअंतर्गत जमीनीचा लाभ उठविणाऱ्यांमध्ये फारूख अब्दुल्ला यांच्या बहिणीचे नाव 

भारतातर्फे मल्याळम चित्रपट ‘जल्लिकट्टू’ऑस्करच्या शर्यतीत

उत्तर प्रदेशात बळजबरीने धर्मांतर केल्यास तुरुंगाची हवा

संबंधित बातम्या