भारतात दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याची शक्यता; गुप्तचर संस्थांनी हाय अलर्ट केला जारी

अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये (Pakistan) उपस्थित असलेल्या अतिरेकी संघटनेच्या उच्च कमांडरने भारतात (India) असलेल्या त्यांच्या स्लीपर सेलशी संपर्क साधला आहे. भारतावर दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याची शक्यता
भारतात दहशतवादी संघटनेच्या हल्ल्याची शक्यता; गुप्तचर संस्थांनी हाय अलर्ट केला जारी
TerroristDainik Gomantak

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) राजवट आल्यानंतर शेजारील देशांबरोबर जगाच्या चिंतेत अधिकच वाढ झाली आहे. यातच आता गुप्तचर संस्थांनी भारतात अलर्ट जारी केला. खरं तर, गुप्तचर संस्थेच्या मते, आयएस केपी (IS KP) या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी भारतात स्फोट करु शकतात अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या अतिरेकी संघटनेच्या उच्च कमांडरने भारतात (India) असलेल्या त्यांच्या स्लीपर सेलशी संपर्क साधला आहे.

भारतात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना आयईडी बनवण्यासाठी आणि लहान शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्याच वेळी, गुप्तचर अहवालांनुसार, IS च्या लक्ष्यांमध्ये उजव्या विचारांचे नेते, धार्मिक स्थळे, पाश्चात्य देश आणि गर्दीची ठिकाणे यांचा समावेश आहे, तसेच ते परदेशी लोकांना लक्ष्य करु शकतात.

Terrorist
जम्मू-कश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची शक्यता, देशातील एजन्सीज् हाय अलर्टवर

दहशतवादी संघटनांना बळ मिळेल

दुसरीकडे, अमेरिका अफगाणिस्तानातून बाहेर पडल्यानंतर तेथे दहशतवादाचा धोका वाढला आहे. त्यामुळे तिथे सक्षम सरकारची नितांत गरज आहे. असे मानले जाते की, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर जगभरात अशांतता निर्माण होऊ शकते अशी मते तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. अफगाणिस्तानात सत्ता काबीज करणाऱ्या तालिबानचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. यामुळे असा अंदाज बांधला जात आहे की आता जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांना बळ मिळेल. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादी कारवाया वाढू शकतात असेही अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दहशतवाद थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.

Terrorist
जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, कुलगामात एका दहशवाद्याचा खत्मा

तालिबानने अफगाणिस्तान काबीज केले

दरम्यान, 20 वर्षांनंतर तालिबानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. त्याचबरोबर अमेरिकेने तिथून आपले सैनिकही पूर्णपणे मागे घेतले आहेत. अमेरिकेने आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली, अमेरिकन नागरिक आणि अफगाण नागरिकांना बाहेर काढण्याचे लष्करी मिशन संपवले. 31 ऑगस्ट रोजी शेवटचे विमान काबूल विमानतळावरुन दुपारी 3:29 वाजता (पूर्व वेळ क्षेत्र) उड्डाण केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com