सूर्यास्तानंतर मृतदेहांचे विच्छेदन करता येईल; केंद्र सरकार मोठा निर्णय

सूर्यास्तानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करत असताना हत्या, आत्महत्या, बलात्कार, छिन्नविछिन्न मृतदेह आणि संशयास्पद प्रकरणांना यातून वगळण्यात आले आहे.
सूर्यास्तानंतर मृतदेहांचे विच्छेदन करता येईल; केंद्र सरकार मोठा निर्णय
PostMortemDainik Gomantak

नवी दिल्ली: भारतामध्ये सूर्यास्तानंतर शवविच्छेदन (PostMortem) करण्यास परवानगी नव्हती. आजपासून संपूर्ण देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येईल. असा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Union Ministry of Health) घेण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandvia) यांनी सोमवारी याबाबतची माहिती दिली. या निर्णयानंतर ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्यासाठी सुविधा असेल त्यांना सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येईल.

हत्या, आत्महत्या, बलात्कार, विछिन्न असलेले मृतदेह आणि संशयास्पद प्रकरणे सोडून योग्य पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतर मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यास परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. तसेच अवयवदानासाठी सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे असा ही उद्देश असल्याची माहिती सूत्रांनी मिळाली आहे.

PostMortem
''राज्यांकडे लसीची कमरता नाही'';केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा दावा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या आरोग्य सेवा महासंचालनालयातील समितीने सूर्यास्तानंतर शवविच्छेदनाच्या बाबतची तपासणी केली. यामध्ये काही संस्था रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करत आहेत अशी चर्चा या बैठकीदरम्यान झाली. तसेच वाढत्या तंत्रज्ञानातील (Technology) वेगवान प्रगती आणि सुधारणांचा विचार करता शवविच्छेदनसाठी आवश्यक प्रकाश आणि आवश्यक पायाभूत सुविधांची उपलब्धता असलेल्या रुग्णालयांमध्ये (hospital) रात्रीच्या वेळी शवविच्छेदन करता येईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com