'सोनार बांगला घडवण्यासाठी बंगालमध्ये सत्ता हवी' 

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 18 फेब्रुवारी 2021

‘’पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार पाडणे आमचे ध्य़ेय नाही, तर बंगालमध्ये सध्या असणाऱ्या परिस्थितीत बदल करणे हे आहे.

उत्तर चोवीस परगणा : आगामी काळात पश्चिम बंगालमध्ये निवडणूका होणार आहेत. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात आरोप- प्रत्यारोपांच्या झडत असताना,भाजपने निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आज बंगालमध्ये परिवर्तन यात्रेस सुरुवात केली आहे. या परिवर्तन सभेमध्ये गृहमंत्री अमित शहा देखील सहभागी झाले होते. ‘’आम्हांला सोनार बांगला घडवण्यासाठी राज्य़ात सत्ता हवी आहे. बंगालमधील विधानसभा निवडणूक भाजपचे कार्यकर्ते आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यात होणार आहे,’’ असे अमित शहा यांनी उत्तर चोवीस परगणामधील काकद्वीप मध्ये भरलेल्या परिवर्तन सभेत म्हटले आहे.

‘’पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार पाडणे आमचे ध्य़ेय नाही, तर बंगालमध्ये सध्या असणाऱ्या परिस्थितीत बदल करणे हे आहे. त्याचबरोबर राज्यात असणाऱ्या गरीब जनतेच्या आणि महिलांच्या परिस्थितीत अमूलाग्र बदल करायचा आहे. आणि यालाच आमचे येणाऱ्या काळात प्राधान्य असणार आहे. आगामी काळात निवडणूकीच्या माध्यमातून हे केवळ राजकिय स्वरुपाचे सत्तातंर नसेल तर गंगासारमधील जनतेला सन्मान देण्यासाठी असेल. तसेच गंगासागरमधील परिसरात मासेमारी करणाऱ्यांच्या परिस्थितीत बदल करण्यासाठी सुद्धा असेल. ममता बॅनर्जींंच्या कार्यकाळात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारेल का ? तसेच ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असताना बंगाल विकासाच्या मार्गावर चालेल का? ‘’ असे प्रश्न यावेळी उपस्थित करत गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्य़मंत्री ममता बॅनर्जी यांच्य़ावर निशाणा साधला आहे.

ट्विट प्रकरण : शूटिंग बंद पाडू; अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांना काँग्रेसचा...

राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याची घोषणा यावेळी गृहमंत्री अमित शहा यांनी केली. भाजपद्वारे राज्यात सुरु केलेली ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. येणाऱ्या काळात लवकरच बंगालमध्ये निवडणूकांची घोषणा होणार आहे. 
 

संबंधित बातम्या