राहुल गांधी कुठल्या ग्रहावरून आलेत म्हणत प्रकाश जावडेकरांचा पलटवार 

दैनिक गोमन्तक
बुधवार, 17 मार्च 2021

राहुल गांधी यांच्या आरोपांवर केंद्रीय मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी वर्तमान सरकारची तुलना सद्दाम हुसेन आणि मोहम्मद गद्दाफीशी केल्यानंतर (Prakash Javadekar) प्रकाश जावडेकर यांनी देशाने आणीबाणीच्या काळातच सद्दाम आणि गद्दाफी पाहिले असल्याचा शाब्दिक टोला लगावला.       

काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व नेते राहुल गांधी हे वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन केंद्र सरकारला धारेवर धरत असतात. त्यातच आज सभागृहातील आपला माईक बंद करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून त्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी यांनी आज देशाच्या परिस्थिती बद्दल बोलताना चिंता व्यक्त केली. व पुढे त्यांनी इराकचे हुकूमशाह सद्दाम हुसेन आणि लिबियाचा हुकूमशहा मोहम्मद गद्दाफी हे सुद्धा आपल्या देशात निवडणूका जिंकत होते, असे म्हणत सध्याच्या सरकारची तुलना सद्दाम आणि गडाफीशी केली. अमेरिकेच्या ब्राऊन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आशुतोष वार्ष्णेय यांच्याशी ते व्हर्चुअल माध्यमातून संवाद साधत होते. याप्रसंगी प्रोफेसर आशुतोष वार्ष्णेय यांनी केलेल्या प्रश्नावर राहुल गांधी उत्तर देत होते. (Prakash Javadekar responds to Rahul Gandhis criticism)

यावेळी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी, सभागृहात चर्चा करत असताना मुद्दामहून आपल्या समोरचा माईक बंद करण्यात येत असल्याचा आरोप केला. व या माध्यमातून सरकार आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. मात्र राहुल गांधी यांच्या या आरोपांवर केंद्रीय मंत्री व भाजप नेते प्रकाश जावडेकर चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांनी वर्तमान सरकारची तुलना सद्दाम हुसेन आणि मोहम्मद गद्दाफीशी केल्यानंतर (Prakash Javadekar) प्रकाश जावडेकर यांनी देशाने आणीबाणीच्या काळातच सद्दाम आणि गद्दाफी पाहिले असल्याचा शाब्दिक टोला लगावला.       

शेतकऱ्यांच्या मृत्यूवर राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भावनिक साद

तसेच, (Prakash Javadekar responds to Rahul Gandhis criticism) कधी कधी राहुल गांधी हे कोणत्या ग्रहावरून आलेत हा प्रश्न पडत असल्याचे प्रकाश जावडेकर म्हणाले. कारण राहुल गांधी काय बोलतात याचे त्यांना स्वतःलाच भान नसल्याचे प्रकाश जावडेकर यांनी पुढे म्हटले. त्यामुळे राहुल गांधी यांच्या टीकेकडे जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नसल्याचे मत त्यांनी पुढे व्यक्त केले. 

दरम्यान, प्रोफेसर आशुतोष वार्ष्णेय यांच्याशी झालेल्या संवादामध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे कित्येक खासदार आपल्याला बोलू दिले जात नसल्याचे खासगीत सांगतात, असे सांगत पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, '' राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दुसरी मुस्लिम ब्रदरहूड संघटना आहे.'' तर राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना ही मुस्लिम ब्रदरहूड या एक कट्टरपंथीय संघटनेशी केली आहे. व या संघटनेवर अनेकदा बंदी घालण्यात आली होती. (Prakash Javadekar responds to Rahul Gandhis criticism)

संबंधित बातम्या