न्यायालयीन अवमानप्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 सप्टेंबर 2020

न्या. अरुण मिश्रा यांनी हे आदेश देताना भूषण यांना हा दंड भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मर्यादा ठरवून दिली

नवी दिल्ली: देशाच्या न्यायव्यवस्थेवर आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी न्यायालयीन अवमानाच्या खटल्याला सामोरे जाणारे ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने आज एक रुपयांचा दंड ठोठावला. 

न्या. अरुण मिश्रा यांनी हे आदेश देताना भूषण यांना हा दंड भरण्यासाठी १५ सप्टेंबरची मर्यादा ठरवून दिली असून तोपर्यंत भूषण यांनी हा दंड भरला नाही तर त्यांना तीन महिन्यांचा कारावास तसेच तीन वर्षे वकिली करण्यास प्रतिबंध अशी शिक्षा ठोठावण्यात येईल असे न्यायालयाने म्हटले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कात्री लावती येणार नाही पण इतरांच्या हक्कांचा देखील तितकाच सन्मान ठेवला जायला हवा, असे खंडपीठाने नमूद केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या