शिक्षेबाबत सुनावणी पुढे ढकलावी : प्रशांत भूषण

पीटीआय
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी शिक्षेबाबतची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरलेले ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी शिक्षेबाबतची सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर फेरयाचिका दाखल करून त्यावर विचार होईपर्यंत सुनावणी पुढे ढकलावी, असे त्यांनी म्हटले आहे. 

आजी-माजी सरन्यायाधीशांवर आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यक्षमतेवर टीका करणारे ट्वीट केल्याबद्दल भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्टला दोषी ठरविले असून उद्या (ता.२०) त्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षेबाबत सुनावणी होणार आहे. शिक्षेबाबतच्या निकालाचा सविस्तर अभ्यास करून त्याविरोधात फेरविचार याचिका दाखल करण्याचा आपण करत आहोत. निकालानंतर तीस दिवसांत अशी याचिका दाखल करण्याचा अर्जदाराला अधिकार दिला आहे. त्यामुळे शिक्षेची सुनावणी पुढे ढकलावी, असे भूषण यांनी म्हटले आहे. तसेच, उद्या न्यायालयाने सुनावणी घेत शिक्षा सुनावली तरी अंमलबजावणी फेरविचार याचिकेवरील निर्णयापर्यंत स्थगित करावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
 

संबंधित बातम्या