प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार ?
Prashant kishor And Rahul GandhiDainik Gomantak

प्रशांत किशोर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार ?

कॉंग्रेस (Congress) नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत आगामी काळातील निवडणुका (Elections) सोडुन इतर विषयांवर देखील चर्चा झाल्याचे समजते आहे.

निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant kishor) हे येणाऱ्या काळात कॉंग्रेसमध्ये (Congress) प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. प्रशांत यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्याव्यतिरिक्त कॉंग्रेसप्रमुख सोनिया गांधी यांच्या भेटी घेतल्यानंतर या चर्चा सुरु झाल्या आहेत. मंगळवारी झालेल्या या बैठकीबद्दत फक्त आगामी विधानसभा निवडणुका नसुन त्यापेक्षा "काहीतरी मोठं" असल्याचं बोलल्या जाते आहे. (Prashant Kishor is likely to enter the Congress)

मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक फक्त पंजाब किंवा उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांपुर्ती नव्हती. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाची रणनीती आखण्यात प्रशांत किशोर महत्वाची भूमिका बजावू शकतात, असे संकेत मिळता आहेत.

Prashant kishor And Rahul Gandhi
"2024 मध्ये काँग्रेसचंच सरकार येणार"

प्रशांत किशोर यांनी मागे एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत असे सांगितले होते की, 'मी सध्या जे काम करतो ते पुढे चालू ठेवू इच्छित नाही. मी या क्षेत्रात भरपुर काम केलंय. थोडी विश्रांती घेण्याची आणि आयुष्यात काहीतरी वेगळं करण्याची वेळ आता आली आहे. मला ही जागा सोडायची आहे. ' त्यांच्या या विधानावरुन ते राजकारणात प्रवेश करु शकतात असा अंदाज वर्तवला जात होता.

Related Stories

No stories found.