West Bengal Elections: मतदानाच्या दिवशी समोर आली 'वादग्रस्त ऑडिओक्लिप'

दैनिक गोमंतक
शनिवार, 10 एप्रिल 2021

पश्चिम बंगालमधील चौथ्या टप्प्यातील निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाने तृणमूल कॉंग्रेसचे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे.

पश्चिम बंगालमधील चौथ्या टप्प्यातील निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षाने तृणमूल कॉंग्रेसचे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता सारखीच असल्याचे या ऑडिओ क्लिप मध्ये प्रशांत किशोर यांनी सांगितल्याचे दिसून आले आहे. यावर प्रशांत किशोर यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. (Prashant Kishor reacts to the audio clip brought forward by the BJP)

चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी 'माउंटन स्ट्राईक कॉर्प्स' जवान

समोर आलेल्या या ऑडिओ क्लिप मध्ये प्रशांत किशोर काही पत्रकारांशी क्लबहाऊस या अॅपवर चर्चा करीत असल्याचे दिसून येते आहे. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी हे ऑडिओ ट्विट करत ''राज्यात एंटी इनकंबेंसी आहे आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे 50  टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त हिंदू भाजपला मतदान करतील, असे प्रशांत किशोर म्हणत आहेत" असे सांगितले आहे. ही ऑडिओक्लिप व्हायरल झाल्यांनतर प्रशांत किशोर यांनी आपली बाजू मांडली आहे. भाजपने ऑडिओचा निवडक भाग दाखवला असून त्यांनी संपूर्ण ऑडिओ समोर ठेवला पाहिजे, असे मत प्रशांत किशोर किशोर यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते असेही म्हणाले की 'माझ्या क्लबहाऊसच्या गप्पांना भाजपच्या लोकांनी  त्यांच्या नेत्यांच्या अभिभाषणापेक्षा अधिक महत्त्व दिले ही बाब आपल्यासाठी आनंददायी आहे.' असा टोमणा देखील प्रशांत किशोर यांनी यावेळी विरोधकांना मारला आहे.  

दरम्यान, याबद्दल अमित मालवीयांनी ट्विट करताना असे हिले की "ममता बॅनर्जी यांचे निवडणूक रणनीतीकार असे मानतात की डावे, कॉंग्रेस आणि टीएमसीने गेल्या 20 वर्षांत मुस्लिम तुष्टीकरण केले आहे. यामुळे हिंदूंमध्ये असंतोष आहे.", तसेच या गप्पा सार्वजनिक असल्याचे स्पीकर्सना जाणवले नाही त्यामुळे  या गोष्टी समोर आल्याचे अमित मालवीय यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या