'काँग्रेस अध्यक्ष पद कुणा एकाचा दैवी अधिकार नाही', राहुल गांधीं पुन्हा प्रशांत किशोरांच्या टार्गेटवर

त्याचबरोबर प्रशांत किशोर यांनी लखीमपूर खेरी घटनेवरही विधान केलं आहे
Prashant Kishor slams Rahul Gandhi over Congress Chief issue
Prashant Kishor slams Rahul Gandhi over Congress Chief issueDainik Gomantak

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी गुरुवारी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. प्रशांत किशोर यांनी ट्विट करत 'काँग्रेसचे नेतृत्व हा कोणा एका व्यक्तीचा दैवी अधिकार नाही, विशेषत: गेल्या 10 वर्षांत पक्षाने 90 टक्क्यांहून अधिक निवडणुका गमावल्या असताना.' असा हल्ला केला आहे. “एक मजबूत विरोधी पक्षासाठी, काँग्रेस ज्या विचारांचे प्रतिनिधित्व करते ते महत्त्वाचे आहे. पण काँग्रेसचे नेतृत्व हा कोणा एका व्यक्तीचा दैवी अधिकार नाही, विरोधी पक्षनेतृत्वाची निवडणूक लोकशाही पद्धतीने होऊ द्या." अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. (Prashant Kishor slams Rahul Gandhi over Congress Chief issue)

काही महिन्यांपूर्वी प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा पसरली होती. मात्र, आता त्यांनी प्रबळ विरोधी पक्षाचे नेतृत्व करण्याच्या काँग्रेसच्या कथित दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.प्रशांत किशोर यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्याचबरोबर प्रशांत किशोर यांनी लखीमपूर खेरी घटनेवरही विधान केलं आहे. 'काँग्रेस या घटनेवर रातोरात जागा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.'लखीमपूर खेरीमध्ये केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांची गाडी शेतकऱ्यांवर चढली होती.

Prashant Kishor slams Rahul Gandhi over Congress Chief issue
काँग्रेस 2024 लाही सत्तेपासून दूरच; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा घरचा आहेर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com