Prashant Kishor: '9 वी पास व्यक्ती उपमुख्यमंत्री बनतो पण...,' तेजस्वी यादवांवर टीकास्त्र

Bihar Politics: बिहारमध्ये दुसरे कोणी नववी पास झाले असते तर त्याला शिपायाची नोकरी मिळाली असती, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
Prashant Kishor
Prashant KishorDainik Gomantak

Prashant Kishor: प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार आणि एकेकाळी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे खास असलेले प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. बिहारमध्ये दुसरे कोणी नववी पास झाले असते तर त्याला शिपायाची नोकरी मिळाली असती, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.

वृत्तानुसार, जन सूरज यात्रेदरम्यान लोकांशी संवाद साधताना प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले की, 'तेजस्वी यादव यांना बिहारचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे, याचे एकमेव कारण म्हणजे तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) हे आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचे पुत्र आहेत. लालू यादव यांचे पुत्र असल्याने, तेजस्वी यादव हे 9 वी पास असूनही बिहारचे (Bihar) उपमुख्यमंत्री आहेत.'

Prashant Kishor
Prashant Kishor: प्रशांत किशोर यांच्या 'जनसुराज पदयात्रेला' पाटणा येथून सुरूवात....

दुसरीकडे, स्थानिक बोलीभाषेत लोकांशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले की, "लालूजींचा मुलगा नववी पास असून, तो मुख्यमंत्री होत आहे. तुमचा मुलगा नववी पास असेल तर त्याला शिपायाची नोकरी तरी मिळते का? कृपया मला सांगा. त्याला मिळावे की न मिळावे. ज्याचे वडील आमदार आहेत, कोणाचे बाबूजी मंत्री, मुख्यमंत्री आहेत, आणि त्यांचा मुलगा नववीत नापास झाला तरी त्याला नोकरी मिळते, आणि तो राजा म्हणून राहतो. हे बदलायला हवे की नको."

Prashant Kishor
Money Laundering Case: दिल्ली दारू घोटाळ्याबाबत ईडीची पुन्हा कारवाई, दिल्ली-पंजाबसह 35 ठिकाणांवर छापे

सध्या, प्रशांत किशोर बिहारमध्ये जन सूरज पदयात्रेवर आहेत. पीके 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींचे कार्यस्थळ पश्चिम चंपारणमधील भितिहारवा येथून पदयात्रेला निघाले आहेत. प्रशांत किशोर दररोज 10 किलोमीटर चालत लोकांशी संवाद साधतात. यावेळी, लोकांशी संवाद साधताना पीके यांनी हे वक्तव्य केले. पीके यांची जन सूरज पदयात्रा सुमारे 15 महिने चालणार आहे. यादरम्यान राज्यात 3 हजार किमीची पदयात्रा होणार आहे. आम्ही बिहारमधील जनतेला राज्यातील व्यवस्था बदलण्यासाठी तयार करत आहोत, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com