प्रशांत किशोर यांनी मागच्यावर्षी केलेली भविष्यवाणी ठरतेय खरी?

दैनिक गोमंतक
रविवार, 2 मे 2021

प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाच्या बंगाल मधल्या भवितव्याबद्दल बोलताना भारतीय जनता पक्षाला दुहेरी आकड्यांच्या वर जाता येणार नाही अशी भविष्यवाणी केली होती.

देशाचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर होता आहेत. एकीकडे कोरोनामुळे देशभरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र निवडणुकांचे जोरदार वारे वाहत होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असून पुन्हा एकदा बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. मात्र या संपूर्ण निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या एवढीच चर्चा होती ती त्यांचे निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची. निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर यांनी भारतीय जनता पक्षाच्या बंगाल मधल्या भवितव्याबद्दल बोलताना भारतीय जनता पक्षाला दुहेरी आकड्यांच्या वर जाता येणार नाही अशी भविष्यवाणी केली होती. आज पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे जाहीर होत असताना पुन्हा एकदा प्रशांत किशोर यांचे ते ट्विट चर्चेत आले आहे.(Prashant Kishor's tweet about last year's Bengal result has come under discussion)

पश्चिम बंगालच्या निकालानंतर कंगना रानौत बरळली; नेटीजन्स करतायेत ट्रोल

पश्चिम बंगलामध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी एकूण 8 टप्प्यांत मतदान पार पडले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यांची मोठी फौज बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी उतरलेली पाहायला मिळाली होती. तर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी देखील भारतीय जनता पक्षाला तोडीस तोड उत्तर देण्याची करून मैदान गाजवलेलं पाहायला मिळालं आहे. ममता बॅनर्जी याने निवडणूक रणनीतीकर प्रशांत किशोर यांनी ट्विट (Prashant Kishor's Tweet) करत "भारतीय जनता पक्षाला डबल डिजिट अर्थात 100 पेक्षा जास्त जागा मिळू शकणार नाही.  आणि मिळाल्या तर आपण ही जागा सोडून देऊ" अशी भविष्यवाणी केली होती. एवढ्यावरच न थांबता त्यांनी हे ट्विट सेव्ह करून ठेवा असेही सांगितले होते. त्यामुळे आज जेव्हा तृणमूल काँग्रेस 205 जागांवर आघाडीवर असून भारतीय जनता पक्ष अजून 86 पर्यंतच अर्थात 100 च्या आत असल्याने त्यांची भविष्यवाणी खरी ठरतेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे(Trinmool Congress) सरकार येईल आणि ममता बॅनर्जी बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री होतील असे चित्र स्पष्ट होते आहे.

दरम्यान, देशात कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूचा तांडव सुरू असताना निवडणुकांचे सुरू असताना अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून येता आहेत.

संबंधित बातम्या