Pre Poll survey 2021: राहुल गांधींना पुन्हा कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष करण्याची मागणी; राहूल गांधी मोदींपेक्षा सरस

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 9 मार्च 2021

देशात पुढील महिन्यात पाय राज्यांमध्ये निवडणूका होणार आहे. प्रचारसभेसाठी सुरवातही झाली आहे. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनीच आपली कंबर कसली आहे.

नवी दिल्ली:  भारतीय युवा कॉंग्रेसने (आयव्हीसी) सोमवारी यासंदर्भात एक ठराव संमत केला आणि राहुल गांधी यांची पुन्हा कॉंग्रेस अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याच्या मोहिमेला पुढे आणले. संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.व्ही. श्रीनिवास यांनी आयव्हीसीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या दोन दिवसीय बैठकीच्या पहिल्या दिवशी संमत झालेल्या या ठरावाविषयी माहिती दिली.

“युवा कॉंग्रेस राहुल गांधींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यांचा विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात पक्ष देशभरात पुढे जाईल. देशातील सद्यस्थिती लक्षात घेता भारतीय युवा कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने संयुक्तपणे राहुल गांधींना पुन्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करावे अशी मागणी करणारा ठराव मंजूर केला," असे बी.व्ही. श्रीनिवास म्हणाले.

संसदेत महिलांना 50 टक्के आरक्षण मिळायला हवं 

युवा कॉंग्रेस आपले नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि त्यांना विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात पक्ष बळकट होईल आणि पक्ष देशभरात सक्रिय होईल. या अगोदर बऱ्याच राज्यांच्या कॉंग्रेस कमिटी, किसान कॉंग्रेस आणि एनएसयूआय यांनीही राहुल गांधींना पुन्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवडण्याची मागणी करणारा ठराव संमत केला होता.

कॉंग्रेस पक्षाची संघटनात्मक निवडणूक यावर्षी जून महिन्यात होणार आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या निकृष्ट कामगिरीनंतर राहुल गांधींनी उच्च पदाचा राजीनामा दिला. देशभरातील 543 निवडणुकांपैकी कॉंग्रेसने केवळ 52 जागा जिंकल्या. याशिवाय उत्तर प्रदेशमधील अमेठी येथील पारंपारिक जागेवरही राहुल गांधींचा भाजपाच्या स्मृती इराणीशी पराभव झाला.

राहूल गांधीच्या नावाला जनतेचं समर्थन

देशात पुढील महिन्यात पाय राज्यांमध्ये निवडणूका होणार आहे. प्रचारसभेसाठी सुरवातही झाली आहे. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत सर्वांनीच आपली कंबर कसली आहे. मतदानापूर्वीच सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे. त्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये तृणमूलच्या अध्यक्षा आणि राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गड राखतांना दिसत आहेत तर आसाममध्ये पुन्हा भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकू शकतो असे चिन्ह दिसत आहे.

भाजपमध्ये सिंधिया बॅकबेंचर, कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाही 

पंतप्रधानांच्या देशात होत असलेल्या कामांवर काही राज्यातील जनता समाधानी असल्याचं दिसत आहे. मात्र केरळमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार कॉग्रेस खासदार राहूल गांधी यांनी पंतप्रधान मोदीना मागे टाकल्याचं चित्र दिसत आहे. पंतप्रधान पदासाठी कोणाला पंसंती द्याल असं विचारल्यास केरळमधील 55.84 टक्के लोकांनी राहूल गांधी असं उत्तर दिलं. त्या तुलनेत मोदींच्या नावाला 31.95 टक्के इतकेच मत होतं.

ज्योतिरादित्य सिंधिया यांना मारले टोमणे 

आयवायसीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी आपल्या माजी पक्षाचे सहकारी ज्योतिरादित्य सिंधिया यांना टोमणे मारले. "एकेकाळी कॉंग्रेससाठी महत्त्वपूर्ण असणारी सिंधिया आता भाजपमध्ये बॅकबेंचर झाली आहे आणि तेथे ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, असा जोरदार टोमणा राहूल यांनी सिंधियांना लगावला आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गेल्या वर्षी मार्चमध्ये कॉंग्रेसचा राजीनामा देऊन आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता.

कृपया लक्ष द्या! भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी नविन हेल्प लाइन नंबर जारी केला आहे... 

संबंधित बातम्या