Dalai Lama Statement: दलाई लामा म्हणाले, 'मला भारतात अखेरचा श्वास घ्यायला आवडेल...'

Tibetan Spiritual Leader: तिबेटचे अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी गुरुवारी सांगितले की, 'मला भारतात अखेरचा श्वास घ्यायला आवडेल.'
Dalai Lama
Dalai Lama Dainik Gomantak

Dalai Lama Statement: तिबेटचे अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी गुरुवारी सांगितले की, 'मला भारतात अखेरचा श्वास घ्यायला आवडेल.' हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे बोलताना ते म्हणाले की, 'जर मला चिनी अधिकाऱ्यांनी घेरुन मारले तर तो कृत्रिम मृत्यू असेल. नाहीतर मला भारतात मरायला आवडेल.'

भारतातील लोक प्रेमळ आहेत

युनायटेड स्टेट्स इन्स्टिट्यूट ऑफ पीस ( USIP) ने धर्मशाळा येथील निवासस्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना दलाई लामांनी हे वक्तव्य केले. ते पुढे म्हणाले, 'भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना मी सांगितले होते की, मी आणखी 15-20 वर्षे जगेन, यात प्रश्नच नाही. मला अखेरचा श्वास भारतातच घ्यायचा आहे. भारतात (India) प्रेमळ लोक राहतात. इथे काहीही कृत्रिम नाही.' दलाई लामा पुढे म्हणाले, 'जर मला चिनी अधिकार्‍यांनी घेरुन मारले तर तो कृत्रिम मृत्यू असेल. नाहीतर, मुक्त लोकशाही असलेल्या या देशात मी मरणे पसंत करतो.'

Dalai Lama
Dalai Lama 87th Birthday: 'जगाने भारताकडून प्रेम, अहिंसा अन् करुणा घ्यावी'

दुसरीकडे, फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ते म्हणाले, "मृत्यूच्या वेळी विश्वासू मित्र माझ्यासमवेत असावेत.''

तसेच, चीन (China) सरकार दलाई लामांना फुटीर व्यक्ती मानते. 1950 च्या दशकात, जेव्हा चीनने तिबेटवर बेकायदेशीरपणे कब्जा केला तेव्हा अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला होता. दलाई लामा यांनी तिबेटचा प्रश्न शांततेने सोडवण्यासाठी चीनशी अधूनमधून चर्चेसाठी वकिलीही करण्याचा प्रयत्न केला होता.

Dalai Lama
Dalai Lama: अहिंसा आणि धार्मिक सलोखा जपणारा 'भारत' जगासमोर आदर्श

शिवाय, दलाई लामांबाबत भारत सरकारची (India Government) भूमिका स्पष्ट आहे. ते एक आदरणीय धार्मिक गुरु आहेत. भारतातील लोक त्यांचा मनापासून आदर करतात. त्यांना भारतात त्यांचे धार्मिक कार्य करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. गेल्या महिन्यात दलाई लामा (Dalai Lama) दिल्लीत आले होते. तब्बल तीन वर्षांनी ते दिल्लीत पोहोचले होते. त्याचबरोबर, गेल्या महिन्यात त्यांनी लडाखलाही (Ladakh) भेट दिली होती. मात्र त्यांच्या या भेटीमुळे चीनचा तिळपापड झाला होता. विशेष म्हणजे, दलाई लामा 50 वर्षांपासून लडाखला भेट देत आहेत. यापूर्वी त्यांनी जुलै 2018 मध्ये लडाखला भेट दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com