दिल्लीत अवकाळी पावसाची हजेरी; हवामान खात्याचा गारपीटीचा अंदाज

दिल्लीत अवकाळी पावसाची हजेरी; हवामान खात्याचा गारपीटीचा अंदाज
Presence of unseasonal rains in Delhi Indian Meteorological Department forecasted possibility of hailPresence of unseasonal rains in Delhi Indian Meteorological Department forecasted possibility of hail

नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्ली आणि आसपासच्या भागात शुक्रवारी सकाळची सुरूवात पावसासह झाली. दिल्ली, नोएडा, गाझियाबाद आणि गुरुग्रामसह एनसीआरच्या अनेक भागात पाऊस पडला आहे. सकाळी ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे अंधाराचा तडाखा बसला, त्यामुळे लोकांच्या वाहनांचे दिवे लावून घराबाहेर पडावे लागले. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) देखील दिल्लीत आज गारपिटीचा अंदाज वर्तविला आहे. याचाच अर्थ दिल्ली-एनसीआरमध्ये दिवसा पाऊस होईल आणि काही ठिकाणी गारपीट होऊ शकते. आयएमडीने आधीच अंदाज व्यक्त केला होता की उष्णतेमुळे, 24 तासात वाऱ्याचा वेग वाढल्यास पाऊस पडू शकतो.

यावर्षी दिल्लीत विक्रमी उष्णतेची लाट शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांचा विक्रमही गुरुवारी तुटला. कमाल तापमानाने 35 डिग्री सेल्सियसची मर्यादा ओलांडली आहे. हवामान खात्याने गुरुवारी दिल्ली-एनसीआरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी तेथे तीव्र सूर्यप्रकाश होता. हवामान खात्याच्या माहितीनुसार, गुरुवारी राजधानीचे कमाल तपमान 35.2. अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. 11 मार्च 2012 पासूनचे हे सर्वाधिक तापमान आहे. त्याच वेळी किमान तापमानातही 17.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

दिल्ली-एनसीआरची हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली

गुरुवारी दिल्ली-एनसीआरची हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली. फरीदाबादमध्ये एक्यूआय 277, गाझियाबादमध्ये 287, ग्रेटर नोएडामध्ये 307, गुरुग्राममध्ये 268 आणि नोएडामध्ये 260 आहे. 

तीन दिवसांपूर्वी पाऊस पडला होता

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दिल्ली-एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडला. आदल्या दिवशी राष्ट्रीय राजधानीत किमान तापमान 18.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात­­ आले. हवामानशास्त्रज्ञांनी साधारणपणे ढगाळ दिवस आणि हलका पाऊस किंवा रिमझिम पावसाचा अंदाज वर्तविला होता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com