President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीत विरोधक देणार भाजपला टक्कर?

सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकीची जोरदार चर्चा आहे.
President Election 2022: राष्ट्रपती निवडणुकीत विरोधक देणार भाजपला टक्कर?
Rashtrapati BhavanDainik Gomantak

President Election 2022: सध्या देशात राष्ट्रपती निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, काही आवश्यक कागदपत्रांअभावी तीन अर्जही फेटाळले जाऊ शकतात. मात्र अद्यापपर्यंत भाजप आणि काँग्रेसने याबाबत आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. यावेळी भाजपला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवणे तितके सोपे नसेल. आकड्यांच्या खेळात विरोधकांचा वरचष्मा आहे. संपूर्ण विरोधक एकत्र आल्यास भाजपला पराभवाला सामोरे जावे लागू शकते. (president election 2022 equation bjp needs 2 per cent more vote to win opposition in strong position)

खासदार-आमदारांच्या मतांना किंमत असते

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या निवडणुकीत इलेक्टोरल कॉलेजमध्ये 4809 सदस्य असतील. यामध्ये राज्यसभेचे 233, लोकसभेचे 543 आणि विधानसभेचे 4033 सदस्य असतील. मतदानाच्या वेळी प्रत्येक आमदार आणि खासदाराच्या मताला किंमत असते. यावेळी प्रत्येक खासदाराच्या (MP) मताचे मूल्य 700 इतके निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक राज्याच्या विधानसभेच्या सदस्यांच्या मतांचे मूल्य त्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते.

लोकसंख्येनुसार वजन ठरवले जाते

उदाहरणार्थ, यूपीच्या आमदारांच्या मतांचे मूल्य 208 असेल, तर मिझोराममध्ये (Mizoram) 8 आणि तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) 176 असतील. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आमदारांच्या मतांचे एकूण मूल्य 5,43,231 असेल. त्याच वेळी, संसद सदस्यांच्या मतांचे वजन 543,200 आहे. एकूण यंदा सर्व सभासदांच्या मतांचे वजन 1086431 इतके आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com