Draupadi Murmu Qualification: द्रौपदी मुर्मूंचं Qualification तुम्हाला माहितीये का?

Draupadi Murmu: विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या पदाची शपथ घेणार्‍या देशातील 15व्या आणि पहिल्या आदिवासी महिला असतील.
Draupadi Murmu
Draupadi MurmuDainik Gomantak

Know About Draupadi Murmu Qualification: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला. विद्यमान राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्यानंतर द्रौपदी मुर्मू या पदाची शपथ घेणार्‍या देशातील 15व्या आणि पहिल्या आदिवासी महिला असतील. चला तर मग त्यांच्याविषयी जाणून घेऊया...

द्रौपदी मुर्मू बद्दल जाणून घ्या

द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांचा जन्म 20 जून 1958 रोजी ओडिशातील (Odisha) मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बिरांची नारायण तुडू आहे. त्या संथाल या आदिवासी जमातीमधून येतात.

Draupadi Murmu
Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू यांनी रचले पाच विक्रम, वाचा सविस्तर

जाणून घ्या- द्रौपदी मुर्मू यांची शैक्षणिक पार्श्वभूमी

द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशामधील वरबेडा या छोट्याशा गावातून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. इथे त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी रायरंगपूर येथील श्री अरबिंदो इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये शालेय शिक्षक म्हणून काम असताना उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला.

Draupadi Murmu
Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मू भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मूंना शुभेच्छा दिल्या

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या शर्यतीत आघाडीवर असल्याचे बोलले जात होते. आता मुर्मू यांच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. 18 जुलै रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी (Election) मतदान झाले होते. दुसरीकडे, द्रौपदी मुर्मू एनडीएकडून, तर यशवंत सिन्हा विरोधी पक्षाकडून उमेदवार होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com