राष्ट्रपती रामनाथ कोविंद रुग्णालयात दाखल

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 26 मार्च 2021

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  छाती दुखू लागल्यामुळे दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल (आर अँड आर)मध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालयाने वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, 'छातीत दुखू लागल्याने आज रामनाथ कोविंद आर्मी रुग्णालयात दाखल झाले. त्याची नियमित आरोग्य तपासणी सुरू असून तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे.  मात्र छातीतील दुखण्याचे कारण अद्याप रुग्णालयाने  स्पष्ट केलेले नाही. 

त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींच्या आरोग्याविषयी माहिती घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रकृती बिघडल्याची माहिती कळताच  नरेंद्र मोदीं यांनी राष्ट्रपतींच्या मुलाशी संवाद साधत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत माहिती दिली.  दरम्यान, काही तासांपूर्वीच  रामनाथ कोविंद  बांगलादेशाच्या राष्ट्र प्रमुखांना 50 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 

लॉकडाऊन नंतर पंतप्रधान मोदी यांचा पहिलाच विदेश दौरा 

रामनाथ कोविंद हे भारताचे  चौदावे आणि विद्यमान राष्ट्रपती आहेत. राष्ट्रपती पदाच्या अगोदर त्यांनी  2015 ते 2017 या काळात बिहारचे 26 वे राज्यपाल म्हणून कारभार सांभाळला आहे. त्याचबरोबर 1994 ते 2006 या कालावधीत राज्यसभेचे सदस्य म्हणूनही काम केले आहे. 15 जुलै 2017 रोजी त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.  तर सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश जे. एस. खेहर यांनी त्यांना राष्ट्रपति पदाची शपथ दिली. 

संबंधित बातम्या