राष्ट्रपतींकडून देशवासियांना ईद उल फित्र निमित्त शुभेच्छा

Pib
सोमवार, 25 मे 2020

आज जेव्हा देश कोविड-19 च्या अभूतपूर्व संकटकाळातून जातो आहे, अशा वेळी ‘जकात’ म्हणजेच दानधर्माच्या रीतीचे अधिक संवेदनशीलतेने पालन करुया.

 

नवी दिल्ली,

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासियांना ईद उल फित्रनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“ईद उल फित्रनिमित्त माझ्या सर्व देशबांधवांना आणि परदेशात असलेल्या भारतीयांनाही खूप शुभेच्छा!! रमझानच्या पवित्र महिन्यातल्या प्रार्थना आणि रोजे यानंतर येणाऱ्या ईदनिमित्त सर्वांना शुभेच्छा!  हा उत्सव प्रेम, शांती, बंधुभाव आणि सौहार्द भावना व्यक्त करणारा आहे. या निमित्त आपण देशातील सर्वात दुर्बल घटकांना आधार देण्याचा, त्यांची काळजी घेण्याचा संकल्प करुया!” असे राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.   

आज जेव्हा देश कोविड-19 च्या अभूतपूर्व संकटकाळातून जातो आहे, अशा वेळी ‘जकात’ म्हणजेच दानधर्माच्या रीतीचे अधिक संवेदनशीलतेने पालन करुया. तसेच, ईद साजरी करतांना शारीरिक अंतराच्या नियमांचेही पालन करावे आणि सुरक्षित राहून या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा निश्चय करावा, असे आवाहनही राष्ट्रपतींनी केले आहे.  

ही ईद-उल-फित्र संपूर्ण विश्वात दया,दान आणि अशा अशी मूल्ये रुजवणारी ठरो!

संबंधित बातम्या