राजस्थानात पेट्रोलचे दर शंभरच्या पार

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील मेट्रो शहरात पेट्रोलॉचे दर नव्वदीच्या पार पोहोचले आहे. राजस्थानमध्ये सोमवारी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे.

नवी दिल्ली:  देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. देशातील मेट्रो शहरात पेट्रोलॉचे दर नव्वदीच्या पार पोहोचले आहे. राजस्थानमध्ये सोमवारी पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली आहे. देशात राजस्थानमधील गंगानगरमध्ये पेट्रोलचे दर सर्वात जास्त आहे. श्रीगंगानगर येथे सोमवारी प्रीमियम पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 101.54 रुपये, तर सामान्य पेट्रोल 97.69 रुपये प्रतिलिटर विकले.  अशा परिस्थितीत पेट्रोलच्या वाढत्या किंमतींवर अंकुश ठेवता यावा यासाठी सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सरकारला व्हॅटचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलवर राजस्थानमध्ये सर्वात जास्त व्हॅट आहे.

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा अद्याप बंदच, मात्र लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार -

आयओसीच्या वेबसाईटनूसार सामान्य पेट्रोलचा दर इथे वाढला आहे. प्रीमीअम पेट्रोलसाठी सामान्य नागरिकांना अधिक किंमत मोजावी लागणार आहे. राजस्थानची राजधानी जयपुरमध्ये पेट्रोलचे दर 93.86 रुपये प्रती लीटर आहे तर डिझेलचा दर 85.94 रुपये आहे. श्रीगंगानगरमध्ये डिझेलचा दर प्रतिलिटर 89.46 रुपये आहे. हा भारतातील सर्वात महाग दर आहे. दरम्यान राजस्थानमधील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीं बघून संपूर्ण देशाच्या तुलनेत येथे सर्वाधिक व्हॅट आकारला जातो. राजस्थान राज्यात पेट्रोलवर 38 टक्के व्हॅट लागतो, तर डिझेलवरील दर 28 टक्के व्हॅट लागतो. कोरोनासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवर दहा टक्के अतिरिक्त कर लावला आहे. ज्यामुळे पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत.

भारतीय अर्थव्यवस्था दोन आकडी विकासदर गाठणार आयएमएफने वर्तवला अंदाज -

 

 

संबंधित बातम्या