"मोदी है मौका लेते रहिए...पंतप्रधानांनी विरोधकांना दिलं खास शैलीत उत्तर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

"गालियां मेरे खाते में जाने दो, मोदी है मौका लेते रहिए...." असे म्हणत पंतप्रधानांनी मजेदार स्वरात विरोधकांना उत्तर दिले. राज्यसभेत उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा मुद्दा उपस्थित झाला.

नवी दिल्ली: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल आभार मानल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी राज्यसभेत विधान स्पष्ट केले. या दरम्यान त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले की, आम्ही बुध्दीमान लोक ऐकले होते, पण आता आंदोलनकर्त्यांचा नवा गट आला आहे जो प्रत्येक चळवळीत उपस्थित असतो. ते म्हणाले की अशा लोकांना ओळखून आपण त्यांच्यापासून सावधान व्हायला पाहिजे. अशा लोकांनापासून आपण सावध राहिले पाहिजे, जे भारतात अस्थिरता आणण्याचा पर्यत्न करू इच्छित आहे. त्यांच्यापासून जागरुक राहण्याची आपल्याला गरज आहे. असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

सभागृहात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या ओळी वाचून पंतप्रधान मोदी म्हणाले की, "आम्हाला असे वाटते की, मोठी बाजारपेठ आणण्यात अडथळा निर्माण होत आहे, आमचा असा प्रयत्न आहे की, शेतकऱ्यांना त्याच्या पिकाची विक्री करण्याची परवानगी मिळावी." त्याचबरोबर पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आंदोलन संपण्याचे आवाहन केले आहे. "एमएसपी होते, आहे आणि नेहमीच असेल." असे म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांवर त्यांच्या खास पद्धतीने जोरदार प्रतिउत्तर दिले आहे.  तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन आणि कॉंग्रेसचे खासदार बाजवा यांच्या भाषण व नावाचा उल्लेख करून ते असे काही बोलले की बाजवा स्वत: हसले. त्याच वेळी कॉंग्रेसने गुलाम नबी आझादला घेरावा घातला. 

" जो गालियां है वो मेरे खाते में जाने दो, मोदी है मौका लेते रहिए...." असे म्हणत पंतप्रधानांनी मजेदार स्वरात विरोधकांना उत्तर दिले. दरम्यान राज्यसभेत उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीचा मुद्दा उपस्थित झाला. अध्यक्ष नायडू म्हणाले की, उत्तराखंडमध्ये जे घडले त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटते. या संदर्भात मी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याशी बोललो. ते म्हणाले की अद्याप बरेच लोक गुहेत अडकले आहेत. याबद्दल मी गृहमंत्री यांना सभागृहात माहिती देण्यास सांगेन.

 

संबंधित बातम्या