कोविड प्रतिबंधात्मक तयारीच्या आढाव्यासाठी पंतप्रधानांनी घेतली बैठक.

 The Prime Minister held a meeting to review the Covid preventive preparations.
The Prime Minister held a meeting to review the Covid preventive preparations.

नवी दिल्ली, 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील कोविड-19 विषयक परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन, नीती आयोगाचे सदस्य, कॅबिनेट सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधानांनी देशातील विविध भागातल्या कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीची आणि सर्व राज्यांच्या सज्जतेची माहिती घेतली. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिस्त पाळण्याबाबत वारंवार सांगितले जावे, असे निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले. कोविड बाबतची माहिती आणि जागृती व्यापक स्तरावर केली जावी आणि संक्रमण पसरणार नाही, यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवेत असेही पंतप्रधान म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यांनी देशातील विविध राज्यात कोविडची परिस्थिती आणि तयारीचा आढावा घेतला. सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक स्वच्छता आणि सामाजिक शिस्त याचे पालन करण्याबाबत लोकांशी वारंवार बोलायला हवे असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. 

कोविड-19 च्या प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी दिल्लीत, केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांचे पंतप्रधानांनी कौतुक केले.  दिल्ली लगतच्या NCR भागात कोविडचे व्यवस्थापन करण्यासाठी देखील हाच दृष्टीकोन असावा, असे पंतप्रधान म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com