पंतप्रधान मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर; ममता दिदी अनुपस्थित राहण्याची शक्यता

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा गेल्या 16 दिवसांमधील दुसरा पश्चिम बंगालचा दौरा आहे. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमापासून दूर राहण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधील हल्दियाला भेट देतील.  पंतप्रधानांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. हल्दियातील एका एलपीजी टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रकल्पातील डोबी-दुर्गापूर नैसर्गिक गॅस पाइपलाइनचे देखील उद्घाटन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा गेल्या 16 दिवसांमधील दुसरा पश्चिम बंगालचा दौरा आहे. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदींच्या या कार्यक्रमांपासून दूर राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसाम आणि पश्चिम बंगालच्या दौर्‍यावर जातील.

कृषी कायदे रद्द करण्यासाठी राकेश टिकैतांनी दिली तारीख

सकाळी 11:45 वाजता पंतप्रधानांनी आसाममधील दोन रुग्णालयांची पायाभरणी केली. ते आसाममधील सोनीतपूर जिल्ह्यातील ढेकियाजुली येथे ‘असम माला’ या योजनेचा शुभारंभ देखील करतील. ‘असम माला’ ही राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्ह्यांसाठी रस्ते बांधण्यासंबंधित एक योजना आहे.भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी पश्चिम बंगालमध्ये पक्षाच्या परिवर्तन रॅलीला सुरुवात केली आहे. मालदामध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या अहंकारामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी असलेली पंतप्रधान किसान योजना नाकारल्याचा आरोप नड्डा यांनी केला. ‘जय श्री राम’ च्या घोषणांमुळे त्या का चिडल्या असेदेखील त्यांनी विचारले. 

रँगिंगमुळे मुलीची आत्महत्या; न्यायालयाने चौंघींना सुनावली शिक्षा

पक्षाच्या ‘शेतकरी सुरक्षा अभियाना’च्या शेवटच्या टप्प्यात भाग घेताना नड्डा म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षाला ‘नमस्ते आणि टाटा’ म्हणण्याची राज्यातील लोकांनी मनापासून तयार केले आहे. ममता बॅनर्जींनी बंगालच्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचे फायदे नाकारून त्यांच्यावर अन्याय केला आहे, असा आरोप नड्डा यांनी केला. आपला अहंकार पूर्ण करण्यासाठी त्यांनी ही कल्याणकारी योजना लागू होऊ दिली नाही. 

संबंधित बातम्या