पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार '9' दिवसांचा उपवास

दैनिक गोमंतक
मंगळवार, 13 एप्रिल 2021

नवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदींचा नऊ दिवसांचा उपवास सुद्धा आजपासून सुरू झाला आहे.

आजपासून देशात चैत्र नवरात्र सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदींचा नऊ दिवसांचा उपवास सुद्धा आजपासून सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शक्तीचे उपासक असून, ते नवरात्रीत नऊ दिवस उपवास सुद्धा करत असल्याचे समजते आहे.( Prime Minister Modi will fast for 9 days On the occasion of Navratri )

शक्तीचे उपासक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी 40 हून अधिक वर्षे उपवास करत आले आहेत. विशेष म्हणजे उपवासादरम्यान ते केवळ गरम पाण्याचे सेवन करतात असेही सांगण्यात येते. 2014 मध्ये ते पहिल्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर अमेरिकेत गेले होते, तेव्हा देशात नवरात्र साजरी केली जात होती. पहिल्यांदाच अमेरिकेत आलेल्या पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांना रात्रीचे जेवण करण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपवास असल्याने फक्त गरम पाण्याचे सेवन केले होते.

यापूर्वी सुद्धा २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे 5 वर्ष संपवून दुसऱ्यावेळी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उरलेले होते, त्यावेळी  11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा घेण्यात आला होता. त्यावेळी देखील 6 एप्रिल ते 14 एप्रिल या काळात देशात नवरात्र साजरी केली जात होती. या दरम्यान सुद्धा निवडणुकीच्या धामधुम असून सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले उपवास पूर्ण केले होते. 

संबंधित बातम्या