पंतप्रधान मोदी आज आसाममधील महाबाहू-ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचे उद्घाटन करणार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आसाममधील महाबाहू-ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचे उद्घाटन करतील. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आसाममधील महाबाहू-ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचे उद्घाटन करतील. त्याचबरोबर धुब्री-फुलबरी या पुलाची पायाभरणी करतील व माजुली पुलाच्या बांधकामाचं भूमीपूजन करतील. पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएमओ) परिपत्रकानुसार, उत्तर गुवाहाटी आणि दक्षिण गुवाहाटी, धुब्री- हाटसिंगिमरी नियामती-मांजुली बेटे येतील जलवाहतुकीचे उद्घटन तसेच, जोगीघोपामधील अंतर्देशीय जलवाहतूक टर्मिनलचा शिलान्यस केला जाणार आहे.

बंगळुरूच्या एकाच इमारतीतील तब्बल 103 रहिवाशांना कोरोनाची लागण

याशिवाय व्यावसायिक सोयीसाठी डिजिटल उपक्रमदेखील सादर केले जातील. ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांच्या काठावर राहणाऱ्या लोकांसाठी विविध विकासात्मक उपक्रम राबविणे हा महाबाहू ब्रह्मपुत्रा प्रकल्पाचा उद्देश आहे.तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी तामिळनाडूतील तेल आणि वायू क्षेत्रामधील मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन करतील. पंतप्रधान कार्यालयानुसार मोदी रामनाथपुरम-तुथुकुडी नैसर्गिक गॅस पाइपलाइन आणि चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमधील पेट्रोलचे सल्फर रहित युनिट देशाला समर्पित करतील.

लखनऊ एसटीएफ पोलिसांनी उधळला घातपाताचा मोठा कट  

त्याचबरोबर पंतप्रधान नागपट्टनम येथे कावेरी बेसिन रिफायनरीचा शिलान्यासही करतील. पीएमओच्या म्हणण्यानुसार, या प्रकल्पांमुळे मोठा सामाजिक-आर्थिक फायदा होईल आणि देश उर्जा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करेल. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कोरोना साथीच्या विरूद्ध भारताची लढाई आज जगाला प्रेरणा देणारी आहे आणि या यशात योग आणि आयुर्वेदाची मोठी भूमिका आहे.

संबंधित बातम्या