पंतप्रधान मोदींच्या मतदारसंघात संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा शिल्लक

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 22 एप्रिल 2021

वाराणसीतील रुग्णालयांमध्ये केवळ 10 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा राहीला आहे.

देशभरामध्ये कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची (Oxgen) कमतरता तीव्रतेने जाणवू लागली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडत आहे. असं असताना दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. ‘’भीक मागा, उधार घ्या नाहीतर चोरी करा पण ऑक्सिजन द्या,’’  असं न्यायालयाने उद्वेगानं म्हटलं आहे. एकीकडे उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारची कानउघडणी केली असता दुसरीकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीमध्ये (Varanasi) केवळ संध्याकाळपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहीला आहे. परिस्थिती इतकी गंभीर आहे की, रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिल्याशिवाय नवीन रुग्ण दाखल करुन घेऊ नयेत असं सांगण्यात आलं आहे. (Prime Minister Modis constituency has enough oxygen stock till evening)

पैशाला हात न लावता चोरट्यांनी पळवली कोरोना लस

वाराणसीतील रुग्णालयांमध्ये केवळ 10 तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा राहीला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वाराणसीचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सर्व खासगी रुग्णालयांना निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार रुग्णालयांमधील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊनच कोरोना रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करुन घ्यावेत आणि त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, असं सांगण्यात आलं आहे. तसेच जोपर्यंत रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी जात नाहीत तोपर्यंत नवीन कोरोना रुग्णांना रुग्णालयामध्ये दाखल करुन घेऊ नये असंही निर्देशामध्ये म्हटलं आहे.

संबंधित बातम्या