पंतप्रधान मोदींच्या आईने घेतली कोरोना लस

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना कोवीड-19 लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

अहमदाबाद: देशात लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून जेष्ठ नागरिकांना सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतली होती. पात्र नागरिकांनी कोरोनाची लस घ्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांना कोवीड-19 लसीचा पहिला डोस मिळाला आहे. पंतप्रधानांनी  ट्विटरवरुन ही घोषणा केली आहे. पात्र नागरिकांनी पुढे येत कोरोनाची लस घ्यावी असं आवाहनही त्यांनी केले.

ममता बॅनर्जी जखमी; कटकारस्थान करून हल्ला केल्याचा आरोप

''माझ्या आईने आज कोवीड-19 लसीचा पहिला घेतला हे ऐकून मला फार आनंद झाला आहे. लस घेण्यास पात्र असलेल्या आपल्या सभोवताली राहणाऱ्या लोकांना मदत करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी मी सर्वांना उद्युक्त करतो,'' असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या आईला कोरोना लसीचा पहिला डोस लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळाला आहे. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षापेक्षा अधिक वय आसणाऱ्या आणि 45 वर्षापेक्षा अधिक वयाचे लोक ज्यांना सहव्याधी आहेत अशांना दुसऱ्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे.

 

संबंधित बातम्या