''काहींना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन दिसंत''
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak

''काहींना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन दिसंत''

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या (Human Rights Commission) 28 व्या स्थापना दिवस कार्यक्रमामध्ये आज पंतप्रधान मोदींनी संबोधनपर भाषण केले.

देशात हिंसाचाराच्या घटना घडल्या की, मानवाधिकारांचा मुद्दा लगेच चर्चेमध्ये येतो आणि सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात. अशा घटनांवर मानवाधिकार आयोग (Human Rights Commission) देखील सातत्याने भूमिका घेत असतो. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 28 व्या स्थापना दिवस कार्यक्रमामध्ये आज पंतप्रधान मोदींनी संबोधनपर भाषण केले. यावेळी देशामध्ये घडणाऱ्या हिंसक घटना आणि त्यामध्ये होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर अशा घटनांवरुन जे लोक केंद्र सरकारवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात त्यांच्यावर देखील यावेळी त्यांनी निशाणा साधला.

Prime Minister Narendra Modi
'खान' या नावामुळेच आर्यन खानवर कारवाई

राजकिय दृष्टीकोनातून मानवाधिकारांकडे पाहिलं जातं

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मानवाधिकाराविषयी टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशातील काही लोकांना केवळ ठराविक घटनांमध्येच मानवाधिकारांचं उल्लंघन दिसते. परंतु तशाच इतर घटनांमध्ये ज्यावेळी उल्लंघन होत असल्याचे मात्र त्यांना दिसत नाही. मानवाधिकाराच्या उल्लंघनाकडे केवळ राजकिय दृष्टीने पाहिलं जातं. अशा प्रकारची भूमिका घेणे लोकशाहीसाठी घातक आहे. यामधून देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे काम करतात”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.