कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली आपत्कालीन बैठक 

कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली आपत्कालीन बैठक 
PM Modi

देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस वेगाने खालावत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील चोवीस तासात कोरोनाची 90 हजाराहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. देशातील कोरोनाची ढासळती परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकार पुन्हा सतर्क झाले आहे. त्यामुळे कोरोनाची बिघडती परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज उच्चस्तरीय बैठक बोलविली असल्याची माहिती मिळाली आहे. या बैठकीत कोरोनाच्या सद्यस्थितीवर चर्चा होत असल्याचे समजते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या कोरोनामधील परिस्थितीबाबत उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत कोरोना आणि देशातील सुरू असलेल्या लसीकरणाशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेतला जात आहे. या उच्चस्तरीय बैठकीत कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव, डॉ. विनोद पॉल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी असल्याचे समजते. पीएम नरेंद्र मोदी हे सध्या या उच्चस्तरीय बैठकीत कोरोना विषाणूच्या देशातील सद्यस्थितीचा आढावा घेत आहेत. आणि सध्या ही बैठक सुरू आहे.

दरम्यान, देशात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना संसर्गाची 93 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. या काळात 513 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील जवळपास 11 राज्यांत कोरोनाची नवीन प्रकरणे अधिकच वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. देशातील एकट्या महाराष्ट्र राज्यात गेल्या एका दिवसात 49,000 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तर, छत्तीसगडमध्ये 5800 पेक्षा जास्त नवीन प्रकरणे सापडली आहेत. दिल्लीबाबत विचार केल्यास दिल्लीत 3500 हून अधिक कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोनाची एकूण प्रकरणे वाढून 1,24,85,509 झाली आहेत. त्याच वेळी, देशातील 1,16,29,289 जण या विषाणूच्या विळख्यातून बचावले आहेत. तर सध्याच्या परिस्थितीला देशात कोरोनाची 6,91,597 सक्रिय प्रकरणे आहेत. शिवाय, आतापर्यंत देशात 1,64,623 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com