पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रचल्या राष्ट्रीय पक्षी मोरावर काव्यपंक्ती

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

आज इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात पंतप्रधान हे मोराला दाणे खावू घालताना दिसतात. १.४७ मिनिटाच्या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरासमवेत वेळ घालवताना दिसतात.

नवी दिल्ली: सेलिब्रिटी किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा लॉकडाउनचा काळ सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आला. मग अभिनेते असो किंवा राजकीय नेते असो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओतून त्यांनी आपल्या निवासस्थानात बागडणाऱ्या मोराला सकाळच्या वेळी दाणे खावू घालत आपले पक्षीप्रेम दाखवून दिले आहे. 

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

भोर भयो, बिन शोर, मन मोर, भयो विभोर, रग-रग है रंगा, नीला भूरा श्याम सुहाना, मनमोहक, मोर निराला। रंग है, पर राग नहीं, विराग का विश्वास यही, न चाह, न वाह, न आह, गूँजे घर-घर आज भी गान, जिये तो मुरली के साथ जाये तो मुरलीधर के ताज। जीवात्मा ही शिवात्मा, अंतर्मन की अनंत धारा मन मंदिर में उजियारा सारा, बिन वाद-विवाद, संवाद बिन सुर-स्वर, संदेश मोर चहकता मौन महकता।

A post shared by Narendra Modi (@narendramodi) on

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक-दीड वर्षापूर्वी योगाचा व्हिडिओ शेअर करत योगाचे दैंनदिन जीवनातील महत्त्व पटवून दिले. आता पंतप्रधानांनी सकाळच्या वेळी व्यायाम करत असताना मोरासमवेत व्यतित केलेला वेळ शेअर केला आहे.  सुमारे दीड मिनिटाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला असून तो व्हिडिओ ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे. 

लॉकडाउनच्या काळात सेलिब्रिटी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा दिनक्रम कसा राहिला, याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनक्रमाचाही यात प्रामुख्याने उल्लेख करता येईल. त्यांनी आज इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात पंतप्रधान हे मोराला दाणे खावू घालताना दिसतात. १.४७ मिनिटाच्या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी मोरासमवेत वेळ घालवताना दिसतात. लोककल्याण मार्गावरील आपल्या निवासस्थानात व्यायाम करतात तर त्याचवेळी मोर त्यांच्या आसपास फिरताना दिसतात. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओत पंतप्रधान निवासस्थानाचा परिसर पाहून आपल्याला ग्रामीण भागाची प्रचिती येते. त्यात एक चबुतरा दिसतो. पक्ष्यांना घरटे तयार करता यावे यासाठी चबुतरा तयार केला आहे. यापूर्वी पंतप्रधानांनी मन की बात असो किंवा अन्य कोणताही कार्यक्रम असो वेळोवेळी आपले निसर्ग आणि पक्षीप्रेम व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर ते डिस्कव्हरी चॅनेलच्या मॅन व्हर्सेस वाइल्ड या लोकप्रिय कार्यक्रमात बेअर गिल्डसमवेत दिसले होते. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओबरोबर एक कविता पोस्ट केली आहे. 

भोर भयो, बिन शोर,
मन मोर, भयो विभोर
रग रग है रंगा, नीला भूरा श्‍याम सुहाना मनमोहक, मोर निराला

मोदी यांनी पर्यावरणावर दोन पुस्तके लिहली आहेत. यात त्यांनी पर्यावरणाविषयीचा दृष्टीकोन समोर ठेवला आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय सौर उर्जेचे महत्त्वही पटवून सांगितले आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या