"पंतप्रधान मोदी चीनसमोर झुकले, चीनला घाबरून दिला भारतमातेचा तुकडा"

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

भारतीय जवानांना फिंगर 4 वरून फिंगर 3 वर का आणलं गेलं ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसमोर झुकले असल्याचा घणाघात कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

नवी दिल्ली :  भारताने भारत-चीन सामेवरच्या भारतीय भूभाग ताबा का सांगितला नाही? भारतीय जवानांना फिंगर 4 वरून फिंगर 3 वर का आणलं गेलं ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनसमोर झुकले असल्याचा घणाघात कॉंग्रेस नेते राहुल गांधीनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.  पंतप्रधान नरेंद्र  मोदी चीनसमोर झुकले. भारताने आपली जमीन चीनच्या वाट्याला जाऊ दिली. नरेंद्र मोदींनीच भारताची जमीन चीनला बळकावू दिली. करण, मोदी चीनला घाबरले असल्याची जहरी टिका राहुल गांधीनी यावेळी केली.

"मी बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं सरकार उलथवायलाच आलोय": गृहमंत्री अमित शहा

एवढंच नाही, तर भारतानं आपल्यासाठी पवित्र असलेलं कैलास पर्वतदेखील चीनच्या ताब्यात जाऊ दिलं. भारत मातेचा पवित्र तुकडा चीनने बळकावला, ही वस्तूस्थिती आहे आणि या सगळ्याला जबाबदार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. भारताच्या सीमेचं रक्षण करणं हे पंतप्रधानांचे कर्तव्य होतं, ज्यात ते कमी पडले ,असं राहुल गांधी म्हणाले. भारत आणि चीन सैन्यादरम्यान मागील वर्षी मे मध्ये लडाखमधील गलवान भागात संघर्ष झाला होता. 

''कोरोनाची लसीकरण मोहीम संपल्यानंतर देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू होणार'' 

त्यामुळे दोन्ही देशांनी आपापले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर समोरासमोर उभे केले होते. मात्र त्यानंतर भारत आणि चीन यांच्यातील सैन्याच्या कोर कमांडर पातळीवरील नवव्या बैठकीत सैन्य माघारीसंदर्भात चर्चा होऊन, पॅंगॉन्ग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यावरील भागातून सैन्य मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. लडाखच्या वादग्रस्त भागातून चिनी सैन्य माघार घेतल्याचा पहिला फोटो समोर आला आहे. भारतीय सैन्याने हा व्हिडिओ जारी केला असून, यामध्ये चिनी टॅंक फिंगर 8 कडे मागे परत जात असल्याचे दिसत आहे.

संबंधित बातम्या