पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा 'एक देश, एक निवडणूकी'चा नारा..

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2020

‘एक देश, एक निवडणूक’ या आपल्या कल्पनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आग्रह धरला आहे. राज्यांच्या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समारोप करताना मोदींनी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत संपूर्ण डिजीटायझेशन व एक देश एक निवडणूक या ‘लक्ष्यां’च्या दिशेने आम्ही आता अग्रेसर व्हायला हवे, असे सांगितले.

नवी दिल्ली :  ‘एक देश, एक निवडणूक’ या आपल्या कल्पनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आग्रह धरला आहे. राज्यांच्या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समारोप करताना मोदींनी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत संपूर्ण डिजीटायझेशन व एक देश एक निवडणूक या ‘लक्ष्यां’च्या दिशेने आम्ही आता अग्रेसर व्हायला हवे, असे सांगितले. काल १२ वर्षांपूर्वी झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचे घाव आम्ही विसरू शकणार नाहीत, असे सांगितले. 

राज्यघटना दिनानिमित्त गुजरातमधील सरदार पटेल पुतळ्याच्या परिसरात ही परिषद भरली आहे. पंतप्रधानांनी म्हटले की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षपूर्तीकडे जाताना आम्हाला काही लक्ष्ये निश्‍चित करावी लागतील. भारताला आज एक देश एक निवडणुकीची गरज आहे. दर काही महिन्यांनी निवडणुका होत रहातात. संपूर्ण डिजिटायझेशनकडे आम्ही जायला हवे.
‘‘सरदार सरोवरच्या ज्या भागात तुम्ही आहात त्या धरणाने गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या चार राज्यांच्या शेतीला व नागरिकांनाही फार मोठे फायदे झाले आहेत. खरे तर हे काम अनेक वर्षांपूर्वी झाले असते तर, जनतेला पाण्यासाठी इतके ताटकळत रहावे लागले नसते. ज्यांनी हा प्रकल्प लटकावला त्यांना या राष्ट्रीय नुकसान केल्याबद्दल पश्‍चात्तापही होत नाही. अशा प्रवृत्तींना आम्हाला देशातून बाहेर काढायचे आहे,’’ असा हल्ला त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता चढवला. पंतप्रधान म्हणाले, ‘‘राज्यघटनेवर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न गेल्या ७० वर्षांत झाले व सत्तरीच्या दशकात तर घटनेवर हल्लाच झाला. पण घटनेनेच त्यांना उत्तर दिले. आणीबाणीनंतर आमची व्यवस्था मजबूत होत गेली. घटनेच्या रक्षणात ‘विधायिका’ या स्तंभाची महत्त्वाची भूमिका आहे. 

आमच्या वेबसाईटवरच्या अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा: 

राजधानी दिल्लीत वाढत्या कोरोनामुळे नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता 

कालच्या देशव्यापी संपात तब्बल २५ कोटी कर्मचारी सहभागी झाले होते 

 

संबंधित बातम्या