पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ: देशवासीयांना केले महत्वाचे आवाहन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 16 जानेवारी 2021

समस्त देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास आजपासून (शनिवार)सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ आज केला.

समस्त देशाचे लक्ष लागलेल्या करोनावरील प्रत्यक्ष लसीकरणास आजपासून (शनिवार)सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ आज केला. खूप दिवसापासून कोरोना लसीची संपूर्ण भारवासीयांना प्रतिक्षा होती, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात मोठ्या लसिकरण मोहिमेचा शुभारंभ केला. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे त्यांनी आज सकाळी साडेदहा वाजता देशवासीयांशी, कोरोना योध्दयांशी संवाद साधला.

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।

या मंगलमय श्लोकाने लसिकरण मोहिमेचा शुभारंभ झाला.

देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी, सरंक्षण दलातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटूंबाचा विचार न करता संपूर्ण देशवासीयांना आरोग्य आणि सरंक्षण सेवा दिली. म्हणून कोरोनाची पहीली लस ही आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीचा खर्च  सरकार उचलणार असल्याचं मोदी यांनी सांगितलं.

भारताची लस इतर  देशापेक्षा स्वस्त असणार आहे.  संपूर्ण देशाला खूप दिवसापासून कोरोना लसीची प्रतिक्षा होती सगळेच भारतवासी कोरोना लसीची वाट बघत होते प्रार्थना करत होते. सगळ्यांनाच लस मिळणार असून नागरीकांनी या मोहीमेला सहकार्य करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, निष्काळजीपणा करून चालणार नाही. लस घेतल्यानंतर सावध राहणे गरजेचे आहे.  मास्क घालणे, साोशल डिस्टन्स पाळणे हाथ साफ करणे लसीकरणानंतरही या नियमांचे पालन करणे गरजेचे असणार आहे. या लसीकरणासाठी देशातील सगळ्याच राज्यांनी सहकार्य केले आहे. 

भारतात २३०० कोरोना टेस्टींग लॅव सुरू करण्याच आश्वासन पंतप्रधानांनी केल आहे. भारत देश असं राष्ट्र बनवायच आहे की जे संपूर्ण विश्वाला कोरोना लसिकरणासाठी मदत करू शकेल.

पंतप्रधानांनी या मोहीमेची देशवासीयांचं, आरोग्य कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करत सुरूवात  केली. “काही क्षणातच देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. 'ज्या प्रकारे तुम्ही  धैर्याने करोनाशी लढा दिला, त्याचप्रकारचे धैर्य आता लसीकरणाच्यावेळी देखील तुम्दाहाला खवायचे आहे."  असं मोदी म्हणाले.

संबंधित बातम्या