"नंदीग्राम मध्ये लोकांनी दीदींना क्लीन बोल्ड केलं"

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

ममता बॅनर्जी यांची बंगाल मध्ये हिट विकेट गेली असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली  आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षात जोरदार लढत असल्याचे पाहायला मिळते आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकांपूर्वी बंगालमध्ये प्रचार सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्धमान येथे प्रचार सभेला संभोधित करत होते. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडले असल्याचे पाहायला मिळाले. ममता बॅनर्जी यांची बंगाल मध्ये हिट विकेट गेली असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली  आहे. (Prime Minister Narendra Modi Said Mamata banerjee was clean Bowled By voters of Nandigram )

ममता सरकारवर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, "आता पर्यंत झालेल्या निवडणुकीत लोकांनी तृणमूल काँग्रेसला बंगालमधून साफ केले आहे, त्यामुळे दिवसेंदिवस दीदींच्या मनात असलेली कटुता आणि संताप वाढत चालला असल्याचे पाहायला मिळते आहे." ममता दीदींनी मा, माटी, माणुषचा नारा देत बंगालवर राज्य केले, परंतु आता त्या प्रत्येक सभेत 'मोदी-मोदी' करता आहेत. बंगालमधील प्रत्येक व्यक्ती दीदींच्या कारभारामुळे त्रस्त असून, बंगालमध्ये नागरिकांना काहीही करायचे असल्यास तृणमूल काँग्रेसला लाच द्यावी लागते, मात्र भाजपचे सरकार ही प्रथा संपवेल, असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी मतदारांना आश्वासित करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी "दीदींच्या लोकांनी बंगालच्या अनुसूचित जातीच्या बांधवाना शिवीगाळ करण्यास सुरवात केली आहे. दीदीच्या  जवळचे लोक या बांधवांना भिकारी म्हणू लागले आहेत, दीदींचे हे शब्द ऐकून बाबासाहेबांच्या आत्म्याला दु: ख झाले असेल." असे म्हणत ममता बँर्जही यांच्यावर टीका केली. 

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) सध्या विधानसभा निवडणूका (Assembly Elections) सुरु असून 294 जागांसाठी एकूण 8 टप्प्यांत मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यातील चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडले असून उर्वरित 4 टप्प्यांचे मतदान झाल्यानंतर 2  मे रोजी या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्ष (BJP) आणि तृणमूल काँग्रेस (Trinmool Congress) या दोन्हीही पक्षांनी कम्बर कसली असल्याचे पाहायला मिळते आहे. 

संबंधित बातम्या