"देशप्रेम हिच आमची विचारधारा" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

"आम्ही घराणेशाहीचे राजकारण करीत नाही, तर कामगारांचा सन्मान करतो", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनसंघाचे संस्थापक नेते दीन दयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'समर्पण दिवस' या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले.

नवी दिल्ली :  “राजकीय अस्पृश्यता ही आपली संस्कृती नाही, देशानेही ती नाकारली आहे. पण हे खरे आहे की आम्ही घराणेशाहीचे राजकारण करीत नाही, तर कामगारांचा सन्मान करतो", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जनसंघाचे संस्थापक नेते दीन दयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त 'समर्पण दिवस' या विषयावर कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, जनपथ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजपचे खासदार व इतर नेतेमंडळी उपस्थित होते. दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारसरणीने व शिकवणीने आम्हाला  शेवटच्या माणसापर्यंत आपली सेवा पोहोचवण्याची शिकवण दिली आहे, ज्याचे आम्ही आजही पालन करतो. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या विचारवंतांनी आत्मनिर्भरतेसारख्या दिलेल्या शिकवणी देशाच्या प्रगती, पायाभूत सुविधा आणि सुरक्षेशी जोडल्या गेल्या आहेत. 

राज्यसभा: भल्या भल्यांना ठसका लावणाऱ्या मिर्चीला येणार का अच्छे दिन?

भारतीय जनता पक्षाने नेहमीच वेगवेगळ्या विचारधारा आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांचा नेहमीच आदर केला आहे . यामुळेच भाजपा सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, कॉंग्रेस नेते तरुण गोगोई आणि एस सी जमीर यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविलं. यापैकी कोणीही राजकारणी आमच्या विचारधारेचे किंवा मित्रपक्षांचे नव्हते. परंतु त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे, असे पंतप्रधान म्हणाले .त्यांनी गोंधळ घालणारी पार्टी असल्याचे सांगत कॉंग्रेसला फटकारले आणि त्यांना देशासाठी किंवा कोणालाही मदत करता येत नाही., असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

व्ही. के. सिंह यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा

“आमची विचारधारा देशप्रेमापासून सुरू होते, जी देशावरील प्रेमामुळे प्रेरित होते आणि राष्ट्राच्या हित हाच आमचा हेतू असतो. जो आम्हाला राष्ट्रहितासाठी राजकारण करण्यास शिकवतो. पक्षाच्या आधीही राष्ट्र आपल्यासाठी प्रथम आहे. सबका साथ, सबका विश्वास हाच आमचा हेतू आहे",असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं. त्यांनी कार्यकर्त्यांना छोटे गट बनवून गुजरातमधील सरदार पटेल आणि वाराणसीतील दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याला भेट देण्यास सांगितले. कारण ती त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्रे असल्याचं ते म्हणाले.

ट्विटरने सरकारचा आदेश मान्य न केल्यास,अधिकाऱ्यांना अटकदेखील होऊ शकते

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि भारतीय जनता पक्षाचा  अग्रदूत भारतीय जनसंघाचे माजी नेते होते. ते डिसेंबर 1967 मध्ये जनसंघाचे अध्यक्ष झाले. लोकसभा निवडणूक त्यांनी लढविली, परंतु त्यांचा पराभव झाला. 11 फेब्रुवारी 1968 रोजी त्यांचे निधन झाले. 10 फेब्रुवारी 1967 रोजी उपाध्याय सियालद एक्स्प्रेसमार्गे पाटण्याला येण्यासाठी रवाना झाले. दुपारी २.१० वाजता जेव्हा ट्रेन मुघलसराय स्थानकावर आली तेव्हा उपाध्याय ट्रेनमध्ये सापडले नाहीत. त्याचा मृतदेह रेल्वे स्थानकापासून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या खांबाजवळ आढळला. मृतदेहाच्या हातात पाच रुपयांची नोट होती आणि नंतर चोरीच्या इराद्याने झालेल्या चकमकीनंतर दरोडेखोरांनी उपाध्याय यांना चालत्या ट्रेनमधून ढकलले, असे सांगण्यात आले.

पंतप्रधान मोदींनी सांगितला आंदोलनकर्ते आणि आंदोलनजीवीमधला फरक; वाचा संपूर्ण भाषण

उपाध्याय शेवटच्या वेळी जौनपुरमध्ये रेल्वेमध्ये दिसले होते. खुनाचा आरोप कोणावरही सिद्ध झाला नाही. आरएसएस आणि उपाध्याय यांच्या परिवाराने अनेकदा या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. सीबीआय आणि न्यायालयीन तपास झाला, परंतु काहीच निष्पन्न होऊ शकले नाही. उपाध्याय यांच्या निधनानंतर 53  वर्षानंतर कॉंग्रेसमुक्त भारताची मोहीम पुन्हा जोर पकडताना दिसत आहे, परंतु दीन दयाल उपाध्याय यांच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलगडलेले नाही.

चीन झुकलं! पॅंगॉन्ग त्सो भागातून सैन्य मागे घेण्यास सुरवात 

संबंधित बातम्या