पंतप्रधान मोदींनी सांगितला आंदोलनकर्ते आणि आंदोलनजीवीमधला फरक; वाचा संपूर्ण भाषण

पंतप्रधान मोदींनी सांगितला आंदोलनकर्ते आणि आंदोलनजीवीमधला फरक; वाचा संपूर्ण भाषण
Copy of Gomantak Banner - 2021-02-10T194504.545.jpg

नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना आपले मत लोकसभेत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात विरोधकांवर आणि खासकरून कॉंग्रेसवर जोरदार हल्ला केला. यासंदर्भात बोलताना पंतप्रधानांनी देशाला आंदोलनकर्ते आणि आंदोलनजीवी यांच्यातील फरक ओळखण्याचे आव्हान केले. शिवाय यावेळेस नरेंद्र मोदी यांनी नव्या कृषी कायद्यांचे फायदे देखील सांगितले. आणि 21 व्या शतकात असताना 18 व्या शतकाप्रमाणे विचार करणे चुकीचे असल्याचे सांगत, सध्या शेती आधुनिक करणे आवश्यक असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. तसेच जागतिक बाजारानुसार कृषी क्षेत्रात उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

त्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे आंदोलन हे पवित्र असल्याचे सांगितले. व भारताच्या लोकशाहीमध्ये आंदोलनाला एक महत्व असल्याचे म्हणत, पण जेव्हा आंदोलक स्वतःच्या फायद्यासाठी पवित्र आंदोलनाला दूषित करण्यासाठी म्हणून बाहेर पडतात तेव्हा काय होते हे सगळ्या राष्ट्राने पाहिले असल्याचे पुढे नरेंद्र मोदी म्हणाले. याशिवाय आंदोलनात अतिरेकी आणि नक्षलवाद्यांच्या सुटकेची मागणी का करण्यात येत असल्याचा प्रश्न देखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला. 

तसेच, शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला खराब करण्याचे काम काही आंदोलनजीवी यांनी केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. दंगल करणारे, जातीयवादी आणि  तुरुंगात असलेल्या अतिरेक्यांचे फोटो हातात घेऊन त्याच्या सुटकेची मागणी करणे हे शेतकऱ्यांचे आंदोलन अपवित्र करण्यासारखे असल्याचे म्हणून हे अपमानजनक आहे, असे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले. याशिवाय, योग्य ते बोलण्यात काहीही गैर नसल्याचे ते म्हणाले. परंतु देशात एक मोठा वर्ग आहे जे योग्य बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो. आणि त्यांचा फक्त बोलण्यावर विश्वास असून, चांगल्या गोष्टीत अशांचा विश्वास नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

याव्यतिरिक्त, विरोधकांवर निशाणा साधताना खेलब ना खेल देइब, खेले बिगाडब या म्हणीचा वापर पंतप्रधानांनी भाषणात केला. आणि देशाच्या विकासाचे चाक रोखण्यासाठी विरोधकांकडून हे सर्व काही सुरु असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर देशाची शक्ती वाढवण्यात सगळ्यांचेच योगदान असल्याचे नरेंद्र मोदींनी सभागृहात सांगितले. देशासाठी सार्वजनिक क्षेत्र जेवढे आवश्यक आहे त्याप्रमाणेच खासगी क्षेत्राचेही योगदान आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आणि आज देश मानवतेसाठी पुढे आला आहे यासाठी देशातील खासगी क्षेत्रामुळेच घडल्याचे त्यांनी पुढे सांगितले. 

तसेच, सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांसाठी 10,000 एफपीओ बनवण्याचे काम करण्यात आले असून, महाराष्ट्र राज्यात देखील याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिली. इतकेच नाही तर केरळ मध्ये देखील कम्युनिस्ट पक्षाचे काहीजण एफपीओची निर्मित करण्यात गुंतले असल्याचे ते म्हणाले. आणि 10,000 एफपीओ बनल्यानंतर लहान शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असल्याचा विश्वास नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे कृषी क्षेत्रात जेवढी गुंतवणूक वाढेल तेवढे देशात रोजगार तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आणि कृषी उत्पादने बाजाराच्या मागणीप्रमाणे आधुनिक होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

देशातील अनेक सन-उत्सव हे कृषी क्षेत्राशी संबंधित असल्याचे पंतप्रधानांनी सांगत, देशातील शेतकरी आत्मनिर्भर होऊन आपला माल कुठेही विकेल यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येत असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. व नवीन कृषी कायदे हे राजनीतीचा विषय नसून हे देशाच्या भल्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर देशात विचित्र तर्क लावला जात असल्याचे ते म्हणाले. कृषी कायदे करण्याची मागणीच झाली नव्हती तर, ती का करण्यात आली, असे काही जणांचे म्हणणे आहे. पण प्रगतिशील समाजासाठी याची गरज असल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. आणि नव्या कृषी कायद्यामुळे देशातील शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था मिळणार असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले. 

इतकेच नाही तर, देशातील शेतकऱ्यांना यापूर्वी मिळणारे हक्क नवीन कायद्यात मिळणार नाहीत का, असा प्रतिप्रश्न देखील पंतप्रधानांनी यावेळी केला. यानंतर हा कायदा लागू करण्यात आल्यानंतर देखील देशातील कोणतीही मंडई किंवा एमएसपीची व्यवस्था बंद पडल्या नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. व उलट एमएसपीचे खरेदी दर वाढले असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोला लगावत, त्यांनी कायदा काळा किंवा पांढरा असल्यावर चर्चा केली. पण तेच या विधेयकाच्या इंटेट आणि कंटेंट वर चर्चा केली असती तर चांगले झाले असते, असे नरेंद्र मोदी म्हणाले. 

कोरोनाच्या काळात देखील इतर विकसित देशांपेक्षा भारताने चांगली कामगिरी केली असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. आणि त्यानंतर देखील देश इतर देशांना मदतीचा हात पुढे करत असल्याचे ते म्हणाले. काही लोक म्हणायचे की भारत हा एक चमत्कारिक लोकशाही देश आहे. मात्र देशाने त्यांचा हा भ्रम मोडला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणि देशातील प्रत्येकाच्या श्वासात लोकशाही भिनली असल्याचे ते म्हणाले. ब्रिटिशांचे शेवटचे कमांडर यांनी भारत भविष्यात अनेक देशांचा खंड होणार असल्याचे म्हटले होते. पण भारत आज जगासाठी आशेचे किरण म्हणून उभे राहिला असून, त्यांची ही भीती मोडून काढली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला सांगितले. 

पुढे बोलताना नरेंद्र मोदी यांनी, राष्ट्रपतींचे भाषण हे भारतातील 130 जनतेच्या संकल्प शक्तीला चित्रित करत असल्याचे सांगितले. आणि देश लवकरच स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करणार आहे. आणि यासाठी गर्व व अभिमान बाळगण्याची मोठी संधी असल्याचे ते म्हणाले. तसेच, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी नवीन संकल्प घेऊन पुढे जायला हवे, असे नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितले.    

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com