पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
narendra modi vaccine

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला असून त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेर करत माहिती दिली. ''मी एम्स रुग्णालयात जाऊन कोव्हिड लसीचा दुसरा डोस घेतला आहे. कोरोना वरती मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे'' तुम्ही लसीकरण करुन घेण्यासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका'', असा संदेश पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना दिला आहे. याअगोदरचा डोस  पहिला डोस त्यांनी 1 मार्चला घेतला होता. त्यांनी त्यावेळी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती. (Prime Minister Narendra Modi took the second dose of corona vaccine)


नरेंद्र मोदींचं स्वदेशी लस घेण्याला प्राधान्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी बनावटीच्या  कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले आहेत. सुरुवातीच्या टप्प्यात कोव्हॅक्सीनच्या सुरक्षिततेविषयी अनेकांच्या मनात शंका  होती, त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोव्हॅक्सीन ही लस घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे देशात मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र, आता नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोव्हॅक्सीन लस टोचून घेतल्याने या लसीविषयीची शंका दूर झाली आहे. परिणामी यामुळे लसीकरण मोहिमेचा वेगही वाढण्याचा अंदाज आहे. दरम्यान, देशात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वेगात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.


दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील कोरोना लसीचा दूसरा डोस आपल्या मुंबईतील राहत्या घरी घेतला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कोरोना लसीचा दुसरा डोस  घेतला असून त्यांनी पहिला डोस 11 मार्च रोजी घेतला होता.

Related Stories

No stories found.