पाया पडण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्याचे नरेंद्र मोदींनीच शिवले पाय

narendra modi.jpg
narendra modi.jpg

कोलकाता : पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरी राज्यात सध्या विधानसभा निवडणुका आहेत. विशेषतः पश्चिम बंगाल(West Bengal) मधील निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागून आहे, कारण ही निवडणूक भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी एकाच आठवड्यात चौथ्यांदा प्रचार सभा घेतली. यावेळी मेदिनीपूर जिल्ह्यातील कंठी विधानसभा क्षेत्रात प्रचार सभेदरम्यानच्या एका कृतीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच चर्चेत आले आहेत.(Prime Minister Narendra Modi Touches the fit of party worker )  

वेगवेगळ्या राज्यांत होणाऱ्या या विधानसभा निवडणुकांसाठी(Assembly Elections) भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार प्रचार सभा घेताना दिसत आहेत. त्यातच आज पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर भागात नरेंद्र मोदी प्रचार सभेला उपस्थित होते. यावेळी मंचावर उपस्थित एका कार्यकर्त्याने नरेंद्र मोदी यांच्या जवळ जाऊन त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्या कार्यकर्त्याच्या पायाला स्पर्श करत नमस्कार केल्याचे दृश्य दिसले. "भाजप एक असे सुसंस्कृत संगठन आहे, जिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समानतेचा संस्कार आहे." या अशयाच्या मजकुरासोबत  भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला गेला आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह पश्चिम बंगाल मध्ये प्रचारासाठी रान पिंजून काढताना दिसत आहेत.  तर दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जी सुद्धा "खेला होबे"(Khela Hobe) म्हणत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शड्डू ठोकून मैदानात उतरलेल्या दिसत आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com